वाट पाहतोय मी त्या पहाटेची......
"विचार करण्यास भाग पाडणारी एक उत्तम कविता एका प्रकारे आरसाच दाखविला गेला " :शुभम चव्हाण ( वाचक), राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (NIT), सुरत वाट पाहतोय मी त्या पहाटेची जेव्हा शेवट होईल काळोखाचा सर्व वाईट गोष्टी दूर सारून जगात जन्म होईल माणसाचा पोटासाठी जगतात प्राणी गत माणसाची पण तीच आहे दुसरा भुकेने मरत का नाही आमच्यात माणुसकीचीच कमी आहे स्वप्ने तर फार मोठी आहेत पण कष्ट करण्यास घाबरतो आमच्यात कोणी पुढे जात असेल तर त्याचे पण पाय खेचतो तुम्ही प्रगतीच काय सांगता आम्ही एका चित्रपटासाठी पण वाद घालतो जाती आणि प्रांत पाहून...