Posts

Showing posts from February, 2020

शेवटी भेटली ती !!

Image
  75% ATTENDANCE        END OF PLACEMENT SEASON     रिया .....रिया पाटणकर. नावातच किती गोडवा आहे ना !! हे होतं आमच्या क्लासमधील बहुतांश मुलांचं regular लेक्चर अटेंड करण्याच कारण. नाहीतर रोज सकाळी कोण ८ वाजता उठेल ते बोरिंग लेक्चर अटेंड करण्यासाठी. फळ्यासमोरचा कंटाळवाणा चेहरा पाहून अगदी झोप यायला लागल्यावर २ क्षण जरी तो सुंदर चेहरा पाहिला तरी ते संपूर्ण लेक्चर झेलण्याची क्षमता यायची. कदाचित त्यामुळेच आमच्या क्लासमध्ये इतर डिपार्टमेंटपेक्षा प्रत्येक सेमला defaulter कमी असावेत. शांत आणि नेहमी अबोल असणारी ती मुलांशी क्वचितच बोले. First Year पासूनच ती माझं crush. पण तिथे पण मी काही एकटा नव्हतो. कॉलेजमध्ये कितीतरी जणांची ती crush होती. पण जिथे सिनिअर्सला देखील भाव ना टाकणारी ती माझ्याशी का बोलेल? या न्यूनगंडापायी तिच्याशी बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही. 2nd year ला असताना एकदा ट्रेन मध्ये सोबत आलो होतो. त्यांनतर तिच्याशी बोलण्याचा प्रसंगच काही आला नाही ना कधी माझी तिच्याशी बोलण्याची हिम्मत झाली.      ...

स्टोरीमध्ये TWIST

Image
  75% ATTENDANCE        PLACEMENT SEASON - PART02   PLACEMENT...... एवढा जीव अडकला होता ना या शब्दामध्ये. २ महिन्यांपूर्वी वाटलं होतं की प्लेसमेंट तर आपलं होईलच. पण आता नाकी नऊ आले होते आणि नवीन कंपनी आली म्हणलं तरी देऊ वाटत नव्हती. सारा उत्साह गेला होता. ७ कंपन्यांतून रिजेक्ट  झाल्यावर आता उत्साह तो राहील तरी कसा? विन्या आणि दिन्या तर त्यांच्या ३-४ कंपनी मध्येच प्लेस झाले. असं नाही की त्यांनी काही फार जास्ती अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी सोबतच कंपन्या यायच्या १ महिन्यापूर्वी प्लेसमेंट साठी अभ्यासाला हात लावला होता. पण साले दोघे लवकर प्लेस पण झाले आणि मी एकटा इकडे अडकलो. रूम मध्ये ४ था विकास पण होता ; न प्लेस झालेला. पण तो गिनती मध्येच नव्हता. दिवसभर रीडिंग रूम  मध्ये पडलेला असायचा. प्लेसमेंट द्यायचीच नाही म्हणून त्याने मनावर घेतलेलं. मागची २ वर्ष MPSC द्यायची म्हणून अभ्यास करत बसलेला. आता GATE देतो म्हणून त्याचा अभ्यास करत बसलेला. मधातच कधी तरी काय झालं काय माहित, एमबीए करायचं म्हणून पुण्यात क्लास करून आलेला. त्याच काहीतरी वेग...