NEET वाटेने जा !!
यंदा आमची बारावी होती. काय थकवणार वर्ष होत हे! दहावी झाली; आता चांगले दिवस येतील अस वाटत होत. मोदीजींनी सांगितलेले 'अच्छे दिन ' हेच असावेत या आनंदात होतो आम्ही, पण दहावीनंतरचा हा आनंद जास्त काळ नाही टिकला. फार फार तर रिझल्टच्या नंतर महिनाभरापर्यंत काय ती मोकळीक होती ; त्यानंतर तर जेवणाची पण उसंत नाही भेटायची. दहावीचा रिझल्ट आला, चांगले ९४ % पडले होते. ९० च्या वर पडले म्हणजे आमच्या येथे तो मुलगा हुशार कॅटेगरी मध्ये मोडतो,आणि हुशार मुलांनी १२ ला सायन्स घ्यायचं ही आमच्या गावची परंपरा होती. बायो आणि मॅथ्स असे १२ ला दोन गट पडतात, म्हणजे डॉक्टर नाहीतर इंजिनीअर ; या पेक्षा काही वेगळं सांगितलंच जात नाही, आणि त्यातल्या त्यात हुशार कॅटेगरी वाल्या पोरांनी बायो घ्यायचं हा ट्रेंड ठरलेला. कारण " इंजिनीअर काय बनतो, घरा घरामध्ये झालेत इंजिनीअर त्यापेक्षा डॉक्टर बन, घराच नाव कमावशील" अस म्हणून PCB ग्रुप ला ढकलल जायच.
माझ्या समोर प्रश्न होता की मी बायो घेऊ का मॅथ्स ...? डॉक्टर बनू का इंजिनीअर ...? घरच्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवलेला होता. माझ्या बाकी मित्रांना ही अडचण आली नाही कारण बहुतांश पालकांनी आधीच ठरवून ठेवलेल की आपल्या मुलाला काय बनवायचे. साहजिकच डॉक्टर नाहीतर इंजिनीअर ; दुसरा एखादा करिअर ऑप्शन क्वचितच कोणीतरी ठरवलेला असेल. मुलांची आवड तर गृहीत पण धरली जात नाही. आमच्यातील बऱ्याच जणांनी बायो घेतल होत. मी पण बायोच घेतलं.
दोन वर्ष सलगपणे अथक वाट लागल्यानंतर आज NEET चा रिझल्ट लागणार होता. बोर्डाचा रिझल्ट लागून बराच काळ लोटला होता. मार्क्स ८१ % पडले होते. तस MBBS च्या प्रवेशासाठी हे मार्क्स महत्त्वाचे ठरत नाहीत, पण एक औपचारिकता म्हणून सगळ्यांना सांगावे लागतात. काळजी मला आजच्या रिझल्टची होती ; कारण आजच्या मार्क्सनुसार MBBS चे प्रवेश ठरणार होते. हा रिझल्ट म्हणजे पुढच्या आयुष्याची एका प्रकारे दिशाच ठरवणार होता.
तसा NEET चा अभ्यास मी नीट केला होता पन मनात एक भीती वाटत असतेच. एकदाचा निकाल website वर पडला. "NEET RESULT DECLARED ....CHECK YOUR MARKS " अशी लिंक दिसली आणि मी लगेच त्या लिंक वर गेलो. ५ मिनिटं पण झाली नसतील रिझल्ट येऊन तोच फोन वर कॉल्स यायला लागली. मी फोनकडे लक्ष न देता आपल काम करत राहिलो आणि हूश्श्श्श...!! शेवटी माझा रिझल्ट स्क्रीन वर आला. मार्क्स....४६२ आले होते. ७२० मार्क्स चा पेपर होता आणि MBBS ची सीट मिळवायची असेल तर माझ्या सारख्या OPEN कॅटेगरी वाल्या मुलाला कमीत कमी ५०० मार्क्स असणे आवश्यकच होत आणि मी तो CRITERION पूर्ण करू शकत नव्हतो. मागच्या वर्षाच्या कटऑफ नुसार मला MBBS ची सीट मिळणे शक्य नव्हते. बस्स..... पुढचे १० मिनिट्स तर मी काही करू शकलो नाही...काही म्हणजे काहीच नाही ... ना बाजूला असलेल्या बाटलीतील पाणी पिऊ शकलो नाही ना त्या वाजणाऱ्या मोबाईलची रिंग बंद करू शकलो...आणि त्या कॉम्प्युटर स्क्रीन कडे केवळ एकटक पणे पाहत बसलो. माझं नाव आणि माझे मार्क्स.... माझ्या नजरे समोर ते दोन वर्ष तरळत होते...दोन वर्ष केलेला अभ्यास ; आई वडिलांनी मेहनत करून वाचवून माझ्या चांगल्या क्लासेससाठी भरलेल्या मोठ्या रकमेच्या फीस ...आणि त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे आता तुटलेला आत्मविश्वास ....
काही वेळा नंतर मी भानावर आलो. तो कर्कश आवाज करणारा फॅन बंद केला,आणि हातानेच डोळे पुसून निलेशच्या घरी गेलो. त्याच्या रूममध्ये सुजीत आणि रितू पण जमलेले होते .माझा उतरलेला चेहरा पाहून त्यांना अंदाज आलेलाच असावा की माझी पूर्ती वाट लागलेली आहे.
तो सामान्य लोकांसाठी एक सर्वसामान्य दिवस होता पण आमच्यासारख्या PCB च्या मुलांसाठी तो एक विस्मरणीय दिवस होता, ज्या दिवशी माझ्या सारख्या बऱ्याच मुलांच्या स्वप्नांना वीरमरण आले असेल. पण चल जाऊ देत ना आता.....एवढा विचार करून माझा रिझल्ट काही बदलणार नव्हता, किंवा पूष्कळ रडलोय म्हणून एखाद कॉलेज मला मेडिकल सीट देऊ करणार नव्हतं. शांतता पूर्ण ५ मिनिटानंतर रितू म्हणाली, कोणी आपले मार्क्स सांगणार आहे का? मी आणि निलेश एकमेकांच्या चेहऱ्या कडे पाहू लागलो. ४११ निलेश ने सांगितले. ४६२ मी पण निर्लज्ज पने सांगितले. " तुला ...रितू ? ", मी रितू ला विचारले . " ५३८ " तिने अगदी शांतपणे सांगितले. म्हणजे आमच्या ग्रुप मधील रितू डॉक्टर होणार होती तर. निलेश अन मी were unlucky guys on the planet होतो. चला आपल्यातील कोणीतरी डॉक्टर होणार होतं असा विचार करून मी एक निःश्वास टाकला! तिला congratulate केलं. पण मनातून खंत वाटत होती की, माझा पण नंबर लागायला हवा होता... पण आता...जाऊ द्या आता.
तीच यश आम्ही celebrate केलं. निलेश च्या मम्मी ने शिरा करून दिला आणि सोबत 'आम्हाला वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला पण चांगलेच मार्क्स आहेत' असे बोलून आमच्या मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला. काही वेळ मी तेथे बसून परत घराकडे निघालो. MBBS मिळणं अवघड होत, आता पुढे काय करावं याचा मी विचार करू लागलो. year drop करून परत एकदा परीक्षा द्यावी किंवा दुसरा एखादा career option घ्यावा. मला काहीच कळत नव्हतं. विचार करता करता मी घरापर्यंत येऊन पोहोचलो. आत जाण्याची मला इच्छा होत नव्हती. काय म्हणून सांगणार घरी की काही २०-४० मार्कांमुळे मला जे हवे आहे ते मी मिळवू शकत नाही...आणि private कॉलेजच्या मोठ्या फीस भरण्याची आपली ऐपत नाही.
मला private कॉलेज मध्ये MBBS ची सीट मिळू शकली असती, पण त्यांच्या त्या लाखोंमधल्या फीस. माझ्या सारख्या मुलांच्या मध्यमवर्गी पालकांसाठी हा एक 'महागडा विनोद'च असतो, ज्याची फक्त आम्ही कल्पनाच करू शकतो. आयुष्यात काही गोष्टी आपल्याला फार हव्याश्या वाटतात आणि बहुदा त्याच आपल्याला मिळत नसतात ..पण त्यामुळे काही आपलं जगणं थांबत नसत आणि थांबवायच पण नसत. ती गोष्ट विसरून पुढच्या प्रवासाला निघायच असत...मला जीवनाने शिकवलेला हा सर्वात मोठा धडा होता.
एक दीर्घ श्वास घेतला ...सर्व विचार थांबविले ...आणि धाडस करून घरात पाऊल टाकले... आता आई वडिलांना पण बोलायला हवं होत ……!!!!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteTouchy lines ... Brother .....keep it up.....n expecting a lot more to come in the near future ....all the very best .....and keep gooing onnn🙌🙏
ReplyDeleteThanks dude
DeleteEmotional
ReplyDeleteThanks
DeleteKhatarnak bhava keep it up
ReplyDeletedhanyawad mitra ...
DeleteVery osm story bro keep it on & upload remaining story as early as possible
ReplyDeletedefinitely i will..read it new every sunday
DeleteBhari bhava..
ReplyDeleteDhanyawad bhai
DeleteVery heart touching lines bro.. Keep it up.. Write more such amazing stories ..give message to all.. Congrats for first writeup��������
ReplyDeleteVery very thanks bro
DeleteGambhir mast ekdam 🙌
ReplyDeleteGambhir mast ekdam 🙌
ReplyDeleteEkdum chaan lihiles bhau
ReplyDeleteDhanyawad bhau
DeleteLet the story continue!! As usual ekdam zhakad Gambhir bhau!! Nandedch ani Maharashtra ch nav roshan kara👍👍
ReplyDeletetumcha ashirvaad ani lekhni chi saath asel tr kahi pn avghad nahiye Ajinkya bhau....
DeleteSuperb bro..!! Very heart touching.
ReplyDeletethanks bro ..!!!
DeleteMast re...
ReplyDeleteKeep it up
thanks gaurav...i will
DeleteEkdam manala lagnare vichar ahet,keep it up bhava
ReplyDeleteNakki bhawa...pn wachat ja every sunday...thoda wel kadhun
ReplyDeleteBhau ekdam aplya saglya poranla lagu honarya lines ahet ya😂
ReplyDeleteho na ....
Deletereally heart touching...remembering my 12th days
ReplyDeletethanks for the compliment :-)
DeletePudhchi pan story banavav ka , mazyajaval khup changla ahe suggestion
ReplyDeletekar na suggest....help hoil
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeletebhari dude...
ReplyDeleteNo words to describe ur Article
Just we say good luck broda..
Hope u never stop writing
Yeah broda....if i have u all are with me ....then the combination is unstoppable....
DeleteTouching n related to everyone's life.......nice ......n eagerly Waiting for the next ...
ReplyDeleteSure bro ....definitely...🙌
DeleteMayur bhau emotional karto ree tu....keep it up bro.....
ReplyDeleteAsa kahi nahi re....😅
DeleteTHIS IS IT BHAU.....
ReplyDeleteDhanyawad bhau...asach PATHIMBA asu dyat
Delete.😊😊
Mast re gambhir. ..
ReplyDeleteHeart touching lines....
waiting Eagarly for Remaining story.......I like that indirect msg to blinde people who select their trade without any thought ....... .
Thanks...sure bro...😎
Delete1 no bhava mala mazya cet chya result nantar chr diwas aathavale
ReplyDeletethanks bhawa... :-)
DeleteMayur तुझी विचार करण्याची शक्ती खूप प्रगल्भ झाली. आहे आणि तू दुसऱ्याला विचार करण्यास भाग पडत आहे. खूप भारी लिहितोय भावा.
ReplyDeleteधन्यवाद मित्रा ..!!
DeleteSuperb yr👏👏
ReplyDeleteMindblowing bro
ReplyDelete