" या प्रश्नाला उत्तर मी बनणार "


"प्रेम नेमक काय असतं..
 ऐकमेकांशी  बोलणं ,
हातात हात घालून चालणं ,
रुसणं फुगणं  आणि  ऐकमेकांना सावरणं
अशीच माझी पण कल्पना होती,पण या कवितेने माझ्यासाठी
 प्रेमाची व्याख्याच बदलली ...."
                    :- राघवेंद्र मंडावले (वाचक),
              श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय,नांदेड










तूच आहेस ती
जिच्यासाठी मी जगतो
कोणी पाहत नसताना
स्वतःशीच हसतो

लहानपणीची मैत्री आपली
पण नियती आड आली
वडिलांच्या transfer मुळे गाव सोडताना
तुझ्या विरहाची जाण झाली

वर्षांनंतर गावी गेलो
वाटले मला पाहून ती रडेल
ती पण गाव सोडून गेलेली
ती मला कशी भेटेल   

तिच्यासाठी धडपडत होतो
गर्दीत शोध घेत होतो 
कधी तरी भेटशील या  जगात
आशेने या मी जगात होतो  

वडिलांनी माझ्या साठी स्थळ शोधलेले
पण मी साफ नकार दिला
तिला भेटल्याशिवाय लग्न करणार नाही
असा मनात निर्धारच केला

देवास केलेली प्रार्थना
अखेर सफर झाली
एका मित्राच्या लग्नात
तिची भेट झाली

तिला बऱ्याच वर्षानंतर पाहून
मला काही सुचलेच नाही
पण आनंदात विरजण पडले
तिने मला ओळखलेच नाही

लहानपणीच्या गोष्टी सांगून
ओळख पटवून द्यायचा प्रयत्न केला
शेवटी मला ओळखले तिने
अखेर जीवात जीव आला

विचारणारच होतो तिला
माझ्याशी लग्न करणार का
एवढ्यात खालून आवाज आला
"काका side देता का ?"

माझ्या  मागून येऊन
एक मूल तिला बिलगले
आई का हि त्याची
म्हणून श्वास माझे थमले

माझ्या  ताईचा हा मुलगा
असं म्हणून ती हसली
पाहून तिला हसत
मनात स्वप्ने पुन्हा बहरली

माझ्यासारखी ती पण होती
तिचाही माझ्यावर जीव होता
माझ्याशिवाय इतर कोणाशी लग्नाचा
 विचार पण तिने केला नव्हता

पण शेवट गोड होणार
ती प्रेमकथा कसली
प्रेमाचीच देवता ती
माझ्यावर पण रुसली

म्हणाली ती वाटले जरी तुला
तू स्वीकारू शकत नाहीस मला
दुर्दैवी मी हीन  आहे
बलात्कार पीडित माझे शरीर मलीन आहे

तिचे हे शब्द कानावर पडले
श्वास माझा  थमला
समाजात वावरणारा हा साप
माझ्या आयुष्यापर्यंत पण पोहोचला

मन सुन्न झाले नि
लगेच राग उफाळला
वाटले महाराजां सारखे घेऊन हातात तलवार
कापून काढावे त्या समाजकंटकांना

म्हणालो मी तिला
 त्यांच्या पापाची शिक्षा
त्यांनाच थेट मिळणार
त्या नराधमांच्या कर्माची फळे
तू का म्हणून भोगणार?
समाज विरोध करतो तर धिक्कार असो त्या समाजाचा
आई वडील विरोध करतील तर नमस्कार करतो त्यांनी दिलेल्या संस्कारांना
लोक म्हणतात बलात्कार पीडित तरुणीशी लग्न कोण करणार
या प्रश्नाला उत्तर मी बनणार
                   -मयूर



Comments

  1. अनपेक्षित गोष्ट ..पण अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात ..खूप सुंदर.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद निकिता दि .... :-)

      Delete
  2. Very nice gambhir👌👌👌👌

    ReplyDelete
  3. Heart touching Gambhir 👌👌

    ReplyDelete
  4. YOU WILL BECOME A STAR ONEDAY ......
    ( तुझ्या सारखा कवी मिळणे नाही )

    ReplyDelete
    Replies
    1. सुजीत भाई ........तुमच्या या ओळींमध्येच हि माझी मेहनत सफल झाली असे मी मानतो ....
      धन्यवाद ............!!!!!!!!!!!!
      :-)

      Delete
  5. खुपच छान मयुर...तुझी कवीता वाचुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या😰

    ReplyDelete
  6. छान मयुर ...keep it up
    god bless u

    ReplyDelete
  7. Very nice Mayur
    Keep writing such wonderful lines

    ReplyDelete
  8. out of the box ,storyline. great mayur.

    ReplyDelete
  9. अतिशय महत्वाचा आणि फार गंभीर विषय अंतर्भूत केला या कवितेमध्ये.
    आवडली कविता👌
    Keep it up !!

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय आभारी आहे राजकुमार .......!!

      Delete
  10. अतिशय आभारी आहे मित्रा.......!!

    ReplyDelete
  11. Nicely written....n loved it alot...in other words









    Void main()
    {int i=1;
    while(i<1001)
    {
    print("\n WOW");
    i++;
    }
    return;
    }

    ReplyDelete
  12. #include
    void main()
    {int i=1;
    while(i<1001)
    {
    print("\n THANKS A LOT");
    i++;
    }
    return;
    }

    ReplyDelete
  13. एक नंबर .....
    कडक

    ReplyDelete
    Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. धन्यवाद मित्रा ..!!

      Delete
  14. Mast re. ...
    जसे बाळाचे पाय पाळणात दिसतात..
    तसे ही कवीता तूझा legasy चे पऱमान आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. तुझे हे शब्द मला नक्कीच प्रोत्साहन देत राहतील हरीश ......
      अगदी मनापासून आभारी आहे ...!!!!
      :-)

      Delete
  15. Hats off to you bro...you are going to become great writer and poet also

    ReplyDelete
  16. In love with your writing brother...best wishes..

    ReplyDelete
    Replies
    1. thanks ....thanks from bottom of my heart...

      :-)

      Delete
  17. Your thought is 👍👍
    But the way you wrote ✒️✒️ is 👌👌👌💯💯
    Remarkable 🖍️🖍️

    ReplyDelete
  18. Small words but very deep meaning.. Very nice poem bro.. Keep it up.. 👍👍👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. Very thanks bro.....😊😊
      Tumchich kripa ahe....
      :-)

      Delete
  19. एक नंबर कडक....
    लई भारी..👌👌

    ReplyDelete
  20. Pranesh Salagarkar22 August 2018 at 10:49

    One of the bestest poem I have ever read. very nice bro.

    ReplyDelete
  21. Kiti tari Kavita vachalya pan evadhi apratim Kavita kadhich Nahi vachu shakalo ....Tod Nahi bhava ya poem la ....kiti mehanat ghetali asashil yacha andaj ahe mala ...keep it up bruhh!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

NEET वाटेने जा !!

स्टोरीमध्ये TWIST