वाट पाहतोय मी त्या पहाटेची......
"विचार करण्यास भाग पाडणारी एक उत्तम कविता
एका प्रकारे आरसाच दाखविला गेला "
:शुभम चव्हाण ( वाचक),
राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (NIT),
सुरत
वाट पाहतोय मी त्या पहाटेची
जेव्हा शेवट होईल काळोखाचा
सर्व वाईट गोष्टी दूर सारून
जगात जन्म होईल माणसाचा
पोटासाठी जगतात प्राणी
गत माणसाची पण तीच आहे
दुसरा भुकेने मरत का नाही
आमच्यात माणुसकीचीच कमी आहे
स्वप्ने तर फार मोठी आहेत
पण कष्ट करण्यास घाबरतो
आमच्यात कोणी पुढे जात असेल
तर त्याचे पण पाय खेचतो
तुम्ही प्रगतीच काय सांगता
आम्ही एका चित्रपटासाठी पण वाद घालतो
जाती आणि प्रांत पाहून
माणसांचे पण भाग पाडतो
तत्त्वज्ञानावर पुस्तके वाचून काढली असतील
पण ते जीवनात वापरण्यास गाडी अडते
डोळ्यासमोर नेहमी 'मी'चाच आरसा लावलेला
ही 'मी' चीच सवय प्रगतीला नडते
'गरिबांसाठी योजना आहे '
म्हणून काही गरीबी कमी होत नसते
अन मूठभर लोकांची श्रीमंती
म्हणजे काही देशाची प्रगती नसते
वादाची एक छोटी ठिणगी पडते
लगेच वणव्याची आग भडकते
'डोळ्याच्या बदल्यात डोळा ' मागीतला जातो
अन या वादातच राष्ट्राची प्रगती अडते
जातीय राजकारणाचा चष्मा उतरवण्यास
आम्ही स्वतः तयार होत नाही
दूषणे देत बसतो मग राजकारण्यांना
"आमच्या देशाची प्रगती होत नाही "
स्वतः सुधारण्यास तयार नसू
तर का ठेवावी दुसऱ्यांना नावे
'ऐकता ' माणुसकीच्या वेशीवर टांगून अशीच
जळत राहतील 'भीमा - कोरेगाव ' सारखी गावे
"मी विचार बदलले तर काय देश बदलणार ..?'
सर्वांनी असे म्हणणे सहज आहे
पण माळेसाठी प्रत्येकच 'मोती' महत्त्वाचा
विचार बदलणे हि काळाची गरज आहे
तर या प्रजासत्ताकदिनी एक शपथ घेऊया
जातीय राजकारणाचा चष्मा बाजूला ठेऊया
सारे मिळुनी एकत्र येऊया
एकत्र येऊया आणि एकत्र घडूया
स्वतःला घडविता घडविता
भारतास महासत्ता घडवुया .....!!!
:मयूर लाभशेटवार

** कोणाच्या हि धार्मिक भावना दुखावणे हा या कवितेचा उद्देश नाहीये ...
" तोडा नाही जोडा " या तत्त्वावर आमचा विश्वास आहे .....
Bhau ekdum chaan👌
ReplyDeleteMast re mayur bhai.. 👌🏻👌🏻
ReplyDeleteMast...
ReplyDeleteEkdam mast mayur
ReplyDeleteMast
ReplyDeleteNice Poem....!!!
ReplyDeleteChan
ReplyDelete