शगुन चा Backlog
( 75% ATTENDANCE PART-03 ) Maths Department ला M1 चा पेपर दाखवत होते. मला इतर विषयांची काळजी नव्हती पण हा अगदी critical विषय होता, कारण lecture च्या पहिल्या दिवशीच हा विषय अवघड जाणार आहे हे मला कळालं होतं आणि त्या नंतर तशी या विषयाचे lecture पण कमीच केलेली. मी आणि विन्या Math department ला पोहचलो. कमी असलेल्या गर्दीवरून अंदाज बांधला की येणारे आम्ही सुरवातीच्या काही पहिल्या मुलांपैकी एक आहोत. तेथील cabin मध्ये सरांचे assistant बसले होते. त्यांनी Role नंबर विचारला. मी लगेच घाई घाईत सांगून दिला "2016BTEIT00021". "Roll No. सांगायला सांगितलंय, PRN नाही ". असं खडूस आवाजात तो assistant माझ्यावर खेकसला. "२१" मी देखील तितक्याच नरमाईत सांगितलं कारण माझा पेपर त्या निष्ठुर मनुष्याच्या हातात जो होता. डेस्क वरील गठ्ठा चाळून त्यांनी मला माझा पेपर दिला. मार्क्स पाहण्याच्या आधी मी एकदा डोळे बंद केले. वर आ...