शगुन चा Backlog
( 75% ATTENDANCE PART-03 )
Maths Department ला M1 चा पेपर दाखवत होते. मला इतर विषयांची काळजी नव्हती पण हा अगदी critical विषय होता, कारण lecture च्या पहिल्या दिवशीच हा विषय अवघड जाणार आहे हे मला कळालं होतं आणि त्या नंतर तशी या विषयाचे lecture पण कमीच केलेली. मी आणि विन्या Math department ला पोहचलो. कमी असलेल्या गर्दीवरून अंदाज बांधला की येणारे आम्ही सुरवातीच्या काही पहिल्या मुलांपैकी एक आहोत. तेथील cabin मध्ये सरांचे assistant बसले होते. त्यांनी Role नंबर विचारला. मी लगेच घाई घाईत सांगून दिला "2016BTEIT00021". "Roll No. सांगायला सांगितलंय, PRN नाही ". असं खडूस आवाजात तो assistant माझ्यावर खेकसला. "२१" मी देखील तितक्याच नरमाईत सांगितलं कारण माझा पेपर त्या निष्ठुर मनुष्याच्या हातात जो होता. डेस्क वरील गठ्ठा चाळून त्यांनी मला माझा पेपर दिला. मार्क्स पाहण्याच्या आधी मी एकदा डोळे बंद केले. वर आकाशाकडे बघून मनातल्या मनात प्रार्थना केली "देवा पास होऊ दे" त्यानंतर पेपरकडे बघितले आणि बघताच डोळे पाणावले कारण केवळ १६ मार्क्स होते आणि passing होती २० ची. मी परत एकदा वर पहिले देवाला जाब विचारण्यासाठी पण कदाचित Result Day असल्या कारणाने system मध्ये traffic असावा.
माझा हा Tragic Drama सुरु असताना विनयचा पेपर एव्हाना मिळाला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताच कळत होत की हा पास झालाय. त्याला २१ मार्क्स होते. अगदी Boundary वर पास झाला होता तो. पण शेवटी passing ही passing च असते. ती टॉप मारून झालेली असो वा boundary वर. सर्व काही हारलेल्या भावनेने मी पेपरच एक एक पान चाळू लागलो. चला by chance मार्क्स मोजण्यात चूक झाली असेल तर, अन अचानक माझ्या डोळ्यात एक वीज चमकली कारण एक ५ मार्क्सचा problem चेक केला गेला नव्हता. आता परत एकदा आशेचे किरण दिसू लागले. मी मॉडेल Answer book चेक केली. माझं फक्त शेवटचं उत्तर चुकलं होतं, बाकी सर्व स्टेप्स बरोबर होत्या. स्टेप्स चे ४ मार्क्स जरी मिळाले असते तरी passing ला पोहोचण्याचे chances होते.
मी Assistant ला यासाठी विचारले असता तो त्याच खडूस आवाजात म्हणाला “मी काय मार्क्स वाढवू शकत नाही. सर आल्यावर सरांना दाखव. येतील थोड्याचं वेळात.जा बाजूला जाऊन थांब”. मी गरीब बिचारा एकटा बाजूला जाऊन थांबलो. मुलं येत होती, मार्क्स पाहत होती आणि मी त्यांचं निरीक्षण करत होतो. काही जणांना ४० मार्क्स पडून देखील टॉप नाही केलं याच दुःख चेहऱ्यावर दिसत होतं तर काही विन्यासारखी मुलं काठावर पास होऊन देखील आकाश मुठीत घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. शेवटी मिळेल त्यात समाधान मानावे हेच सुखी आयुष्यच principle आहे हे माझ्या लक्षात आलं बाकी इतर गोष्टी तर चालतच राहतात.
मी आयुष्याचा परम सत्य जाणण्यात तल्लीन झालो असता तेवढ्यात सर आले आणि मी भानावर आलो. मी लगेचच त्यांच्या मागे धाव घेतली. सरांनी पेपर चाळला आणि फक्त २ मार्क्स दिले. १० मिनिट मोलभाव केल्यानंतर आणखीन १ मार्क् वाढऊन ३ मार्क्स वाढवले. तरीदेखील २० मार्कांची passing काही होत नव्हती. recheck करावा म्हटलं तर उलट मार्क्स आणखीनच कमी झाले असते. शेवटी मी giveup केलं. पेपर assistant ला दिला आणि शांतपणे department च्या बाहेर येऊन थांबलो. आता काही दुसरा option पण नव्हता माझ्याकडे.
मी इकडे उदास-देवदास होऊन बाहेरच्या कट्ट्यावर उभा टाकलो होतो आणि समोरून विन्या सगळं जग जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर घेऊन माझ्याकडे येत होता. " काय सरपोतदार पाहीले का मार्क्स ?" विनय खोचक स्वरात मला म्हणाला. मला कळाल हा आता आपली घेणार आणि घेणार का नाही साला पास झालाय आणि मी fail. "ए विन्या, जास्त उडू नकोस, १ मार्काने पास झाला आहेस तू फक्त" मी पण तितक्याच खोचक स्वरात आणि उपहासात्मक नजरेने त्याच्याकडे पाहून म्हणालो. "हो ,आणि तू फक्त १ मार्काने नापास " असं म्हणून जोरात माझ्याकडे पाहत विनय हसायला लागला. त्याचा तो मनसोक्त आनंद पाहून मला आणखीनच वाईट वाटत होता. “कदाचित...मी पण पास झालो असतो तर” असं म्हणून मी एक निःश्वास टाकला. माझा पडलेला चेहरा पाहून विनय हसायचं थांबला. माझ्या खांद्यावर हात टाकून म्हणाला "अरे वाईट का वाटून घेत आहेस जया. back पडलाय म्हणून !!! अरे इंजिनीरिंग मध्ये back शगुनचा असतोय अन engineering मध्ये येऊन विषय back नाही पडला तर तू घंटा काय engineering केला !" या शब्दात विनय मला motivation देत होता. " तुझा नाही पडलाय ना back म्हणून असं म्हणत आहेस " मी खिन्न स्वरात बोललो. " मला already असे २ शगुन भेटून झालेत म्हणजे back आहेत. १ mech आणि १ graphics. हा एक तर विषय पास झालोय आता" विनय परत हसत म्हणाला. खरंच मला कौतुक वाटत होता याच. हा इतका आनंदी कसा असतोय नेहमी. माझा हा १ विषय back आहे तर मला इतकं वाईट वाटत होतं.
तसं हा विषय back पडलेला मी काही वर्गात एकमेव नव्हतो. माझ्यासोबत आणखीन २१ lucky fellows होते. चला, आता त्यांची तरी साथ आहे म्हणून मी स्वतःलाच सावरले आणि चेहऱ्यावर एक लहानशी smile आणली. आता रडत बसल्याने सर काही माझे १ मार्क वाढवणार नव्हते नाही तो खडूस assistant येऊन माझे काही सांत्वन करणार होता. जर रडत बसण्यात काही फायदाच नाहीये तर मी रडूच का ? हा ना! हा विचार मला पटला आणि माझ्या मनावरचा सगळा ताण एकदम हलका झाला. आता कस अगदी मोकळं मोकळं वाटत होतं. खरंच ही Engineering जगावं कसं हे शिकवत होती. आयुष्याचे धडे गिरवत होती. "झालं गेलं ते विसरून जावं ....प्रवास खडतर फक्त पुढे पाहावं " हा मुद्दा आज मनाला पटत होता.
...........TO BE CONTINUED
(PS- STORY IS FICTIONAL)
DO READ AND SHARE.....!!!!
Engineer ha jagayala shikavanara course aahe
ReplyDeleteBack lagana ha that lach 1 bagh. Mahatwacha he nahi ki tumhi back padala mahatwacha he ahe ki tumhi ti situation Kashi handle keli
Eagerly waiting for the next part