राक्षस !!
(75% ATTENDANCE - PART 05) END OF THE SEASON वेळ सकाळची. लेक्चरला आणखीन १५ मिनिटे होती. मी म्हटलं इतक्या वेळात आपला चहा पिऊनही होईल. असही लवकर जाऊन काही त्या सरांच लेक्चर अटेंड करण्यात माझा काहीच इंटरेस्ट नव्हता पण 75% Attendance भरायची होती ना...! म्हणून लेक्चर करणे तर भागच होते. मी आपलं कँटीन मध्ये आलो. चहा घेतला आणि टेबल कडे वळलो. तेथे पाहतो तर कोपऱ्यात विन्या बसलेला दिसला. मी जाऊन त्याच्या समोरील खुर्चीवर बसलो. काहीतरी विचारात तो असावा, कारण एकटक शून्य दृष्टीत तो पाहत बसला होता. त्याचे लाल डोळे रात्री त्याची पुरेशी झोप न झाल्याची साक्ष देत होते. मी जाऊन त्याच्या समोर ...