शेवटी भेटली ती !!
75% ATTENDANCE
END OF PLACEMENT SEASON
रिया .....रिया पाटणकर. नावातच किती गोडवा आहे ना !! हे होतं आमच्या क्लासमधील बहुतांश मुलांचं regular लेक्चर अटेंड करण्याच कारण. नाहीतर रोज सकाळी कोण ८ वाजता उठेल ते बोरिंग लेक्चर अटेंड करण्यासाठी. फळ्यासमोरचा कंटाळवाणा चेहरा पाहून अगदी झोप यायला लागल्यावर २ क्षण जरी तो सुंदर चेहरा पाहिला तरी ते संपूर्ण लेक्चर झेलण्याची क्षमता यायची. कदाचित त्यामुळेच आमच्या क्लासमध्ये इतर डिपार्टमेंटपेक्षा प्रत्येक सेमला defaulter कमी असावेत. शांत आणि नेहमी अबोल असणारी ती मुलांशी क्वचितच बोले. First Year पासूनच ती माझं crush. पण तिथे पण मी काही एकटा नव्हतो. कॉलेजमध्ये कितीतरी जणांची ती crush होती. पण जिथे सिनिअर्सला देखील भाव ना टाकणारी ती माझ्याशी का बोलेल? या न्यूनगंडापायी तिच्याशी बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही. 2nd year ला असताना एकदा ट्रेन मध्ये सोबत आलो होतो. त्यांनतर तिच्याशी बोलण्याचा प्रसंगच काही आला नाही ना कधी माझी तिच्याशी बोलण्याची हिम्मत झाली.
आज ती अगदी माझ्या समोरच बसली होती. अगदी face TO face. किती विचित्र situation होती ना. कधी असा प्रसंग पण माझ्या सोबत घडेल असे वाटले नव्हते. पण मागची काही दिवस पाहता आता वाटत होतं की खरंच माझ्या आयुष्यात काहीपण होऊ शकत. आधी माझा टर्न होता. मी तिचा HR घेणार होतो. HR मध्ये तसे general questions विचारायचे असतात. Generally Technical questions विचारतच नसतात. मी याचा फायदा घ्यायचा ठरवलं.
आता येणार होती खरी मजा. मी सर्वात आधी तिला introduce करायला सांगितलं. " My name is Riya Patankar and I am pursuing my Engineering …..." आणि त्यापुढे तिने तिचा बायोडेटाच मांडला. १० - १२ कुठून केली, किती पर्सेंटेज होते आणि भरपूर काही. मी तर अगदी हरवून गेलो होतो त्या मधुर आवाजात. जेव्हा ती थांबली तेव्हा मी भानावर आलो. "yes , its right here on your resume", मी त्यावर अगदी प्रोफेशनल असल्याचा आव आणत म्हणालो, " So Riya, tell me something interesting about yourself which is not on your resume". वाह!! काय ती fluent इंग्लिश ; मी स्वतःच impress झालो त्या फ्लूएंसीने. आणि पुढे तिने तिच्या बद्दल त्यात्या इंटरेस्टिंग गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्या हा interview जर झाला नसता तर आयुष्यात कधीच कळल्या नसत्या.
तिला गाण्याचीआवड आहे हे तर आधीच माहिती होतं पण शास्त्रीय संगीतात तिचा कोर्स झालाय हे माहिती नव्हत. पुस्तकं तिला वाचायला आवडतात हे माहिती होत ; पण तिला लेखक बनायची ईच्छा पण आहे हे माहीत नव्हत. मोठा दादा आहे हे तर माहिती होत पण आर्मी मध्ये आहे हे माहिती नव्हत. आर्मीकडून आमचा विषय surgical strike कडे वळला. ती करणे का गरजेचे होते हे जेव्हा ती मुद्देसूद पटवून सांगत होती तेव्हा मला तिला सांगावेसे वाटत होते की भारताने पाकिस्तनावर surgical strike करण्याच्या फार पूर्वी तू माझ्या हृदयावर केलेल्या surgical strike पासून माझे मन आणखीन सावरलेल नाही पण असो ; हे फक्त मनातल्या मनातच बोलू शकत होतो. करंट अफेअर्स तर तिचा फार स्ट्रॉंग होता असं वाटत होतं. यावर काय विचारावं ते मला पण माहिती नव्हतं. जेवढ ती सांगत होती यावर मी फक्त मान हलवून अस दाखवत होतो की हा मला पण माहिती आहे. आता विषय बदलायला हवा म्हणून मी situation based questions कडे वळणार इतक्यात HR ने मला थांबायला सांगितले. वेळ संपला होता. किती लवकर गेला कळलंच नाही.
आता interview घेण्याचा तिचा टर्न होता. ती माझा interview घेणार होती. मी तसे तिला सोपेच प्रश्न विचारले होते, जास्ती ताणले नव्हते ; त्यामुळे ती पण बदल्यात सोपेच प्रश्न विचारेल अस मला अपेक्षित होतं. मी अगदी सोपे म्हणून इंट्रो नंतर hobbies आणि interest कडे वळलो होतो. माझा जो intro झाला त्यानंतर पहिलाच प्रश्न तिने असा विचारला त्यावरच माझी दाणादाण उडाली. ' मागच्या सहा महिन्यात भारताचा GDP growth rate अमुक इतक्या वरून इतका झाला म्हणजेच भारताची अर्थव्यवस्थेचा growth rate खालावत आहे त्याची कारणे काय असू शकतात असे तुला वाटते आणि त्यावर काय उपाय करायला पाहिजे ? ', अश्या आशयाचा हा प्रश्न होता.
मला तर एक शब्द नाही कळला. म्हणून तिला प्रश्न रिपीट करायला सांगितलं. GDP, growth rate काय असतो मला काय माहीत. इंजिनीरिंग करत होतो इकॉनॉमिक्स ची डिग्री घ्यायला थोडीच आलोय इकडे. पण या ठिकाणी उत्तर नाही येत म्हणून तर चालणारच नव्हते. मी थोडा pause घेतला. जरा विचार केला उत्तर तर देऊ शकत नव्हतोच पण ठरवल हार नाही मानायची. येथे आपली creativity दाखवायची. मी अंदाज बांधला की जर आता खालावला आहे तर कधी काळी हा rate चांगला पण असेल आणि झालं ; मला माझा मुद्दा सापडला. मी मान वर केली नि म्हणालो ," काही काळापूर्वी हा Growth rate चांगलाच होता. आज खालावलाय पण परत पूर्वपदावर येईल. काही गोष्टी दुर्लक्षित झाल्या असतील पण भारत सरकार योग्य दिशेने पाऊले उचलत आहे आणि RBI....". अर्थात इंग्लिश मध्ये सांगितले पण नाकी नऊ आले.
पुढे पण interview असच चालत गेला. सगळे असेच प्रश्न. जिथे अगदी बरोबर उत्तर मला माहीतच नव्हत. आता थोड्या वेळा पूर्वीच म्हणालेलो की कोमल, मृदू आणि नाजूक हे तिन्ही शब्द तिचा आवाज describe करण्यासाठी पुरेसे नाहीत पण तिचे मन अगदी कठोर आहे हे मला चांगलंच कळलं. पूर्ण interview तिने एकदा पण माझ्यावर दया नाही दाखवली आणि फार कठीण प्रश्न विचारले. मध्ये मी एकदा बाजूला बसलेल्या HR कडे पहिलं. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून वाटलं की त्यालापण माझ्यावर दया येत असावी. पण आता हार मानेल तो मी कसा होतो. रूमवर दिन्या आणि विन्याला वचन दिलं होतं आज प्लेस होऊनच येणार. त्या moment ला मला जे जे उत्तर देण्यासारख वाटलं ते प्रसंगावधान राखून ते उत्तर मी दिलं. शेवटी कसे तरी ते 10 मिनिट संपले आणि HR ने थांबायचा इशारा दिला.
आमच्या दोघांकडे पाहून तो एकदा हलकासा हसला आणि म्हणाला," this interview was quite Entertaining". कदाचित त्याला पण माझी थट्टा करायची होती. तो review देताना म्हणाला की, पहिला हाल्फ अगदी balanced होता, questions चांगले होते त्यांना उत्तरे पण balanced होती. second half मधील questions त्याने पण expect केले नव्हते. माझी उत्तर तशी up to the मार्क नव्हती पण त्याला माझं presence of mind आवडलं असं तो म्हणाला. मला तर त्यात काही तथ्य वाटत नव्हतं. जे सुचलं ते सांगितलं होतं. कदाचित माझं सांत्वन करण्यासाठी म्हणत असावा. HR माझा मनाप्रमाणे चांगला झालं नव्हता. रडक्या नजरेने मी रियाकडे पाहिलं. काहीच भाव नव्हता तिच्या चेहऱ्यावर ; मी परत मान खाली घातली. HR ने result साठी आम्हाला बाहेर वाट पाहायला सांगितलं .
मी रूमच्या बाहेर पडलो आणि तडक TPO च्या बाहेर जाण्यासाठी चालायला लागलो. " अरे result नाही ऐकायचा का तुला?", मागून तोच आवाज आला. मागे वळून पाहिलं तर तीच होती. " आता काय राहिलंय result मध्ये ", मी एक निःश्वास टाकला. " आज परत एक rejectionआहे अस दिसतंय नशिबात ", मी खाली मान घालून म्हणालो. " अरे अस का म्हणतोस, चांगले उत्तर तर दिलेलास HR ला ", ती माझ्याकडे पाहून म्हणाली. कदाचित तिला पण माझं सांत्वन करायचा होत.
तस अगदी शांत तर मी बसलोच नव्हतो. काही ना काही उत्तर दिलेच होते, पण काय त्याने HR च समाधान होणार होत ? तुलनेत तिला मी किती सोपे प्रश्न विचारले होते आणि तिने सहज उत्तर दिले होते. पण सोडा, मला तिच्याबद्दल तरीदेखील काही राग येत नव्हता. काही झाले तरी प्रेमाचा चष्मा होता ना माझ्या डोळ्यासमोर आणि त्यापुढे मी आंधळा होतो. तसही ती रिया होती. तिचा तो निरागस चेहरा पाहिला तर मीच काय कोणाचा पण राग लगेच निवळला असता. " तुला अवघड प्रश्न विचारले म्हणून राग आला का ? ", तिने तिच्या त्या मृदू , कोमल आणि नाजूक आवाजात विचारलं. मी पण लगेच पाघळून, " नाही, नाही अस काही नाही. चांगेलच होते की questions. मजा आली ", असे म्हणून हसलो. आणि बस्स, तिथून आमचं बोलणं सुरु झाले.
result यायला वेळ होता म्हणून Lipton वर थोडा वेळ बसू असं ती म्हणाली. Lipton वर चहा घेता घेता ती पण अगदी माझ्याशी मोकळेपणाने बोलू लागली. आणि मी पण तिच्या त्या बोलण्यात अगदी हरवून गेलो. मला फार मनापासून वाटत होतं की आज आम्ही दोघं पण याच कंपनी मध्ये एकत्र प्लेस व्हायला पाहिजे. पण HR नुसार तर आज आमच्या पैकी कोणीतरी एकच प्लेस होणार होतं. आता असुदे काहीपण होवो. तिच्या सोबत एवढं बोललो हेच माझ्यासाठी पुरेसे होते. Rejection ची सवय तर अशी पण होतीच मला. झेलू आणखीन एक. आज नाहीतर उद्या सही ; कधी ना कधी होईलच की प्लेस. बोलता बोलता एक तास कसा निघून गेला कळाल देखील नाही. Lipton च्या हवेत आहेच अस एक जादू. इथे कसा वेळ निघून जातो कळत देखील नाही आणि सोबत रिया आहे म्हणल्यावर तर प्रश्नदेखील नाही.
आम्ही दोघे result साठी TPO मध्ये आलो. TPO पूर्ण मुलांनी भरलेल होत. अगदी मागे आम्हाला जागा भेटली तसे आम्ही दोघे बसलो. स्टेज वर एक-एक नाव announce होत होतं. ज्यांचं नाव announce झालं तो तसं स्टेजकडे जात होते. काळजाची हालचाल मला स्पष्टपणे जाणवत होती. नाही म्हणलं तरी जीव होतोच खालीवर. मनाच्या एका कोपऱ्यात वाटत होते की नाही आपलं आज देखील नाही होणार पण दुसऱ्या क्षणी वाटत होत की नाही आज तर व्हायलाच हवं selection. स्टेजवर गर्दी आता वाढत होती. एक एक नाव पुढे येत होत तस खाली मुलांमध्ये आणखीन चलबिचल वाढत होती. बाजूला रियाकडे पाहिलं तर ती दोनीही हात जॊडून डोळे बंद करून देवाला प्रार्थना करत होती. काही क्षण मी पण थांबून तिचा तो निरागस चेहरा पाहण्यात हरवलो. " रिया पाटणकर ....", स्टेजवरून नाव announce झालं. लगेच तिने डोळे उघडले आणि स्टेजकडे पाहिलं मग माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातला तो आनंद जो होता तो पाहून अगदी मी देखील भारावून गेलो. " झाले जयेश मी झाले.... ", अस म्हणून तिने माझा हात जोरात पकडला. मी माझा दुसरा हात तिच्या हातावर ठेवून मी देखील आनंदाने म्हणालो," हो रिया, तू करून दाखवलंस". लगेच भानावर येऊन ती उभी राहिली आणि स्टेजकडे चालायला लागली.
मला देखील आनंद झाला होता पण दुसऱ्याच क्षणी मी भानावर देखील आलो. तिचं झालं म्हणजे माझं झालं नाहीये. म्हणजे आज देखील नशिबात rejection च होतं. आज पण रिकाम्या हातानेच मी परत जाणार होतो. रूमवर जाऊन आता दिन्या आणि विन्याला काय म्हणून तोंड दाखवणार. घरी परत काय सांगणार, "बाबा, तुमचा पोरगा failure आहे. आज पण नाही झालो सिलेक्ट ". नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. "जयेश सरपोतदार....", इतक्यात स्टेज वरून आवाज आला. भानावर येऊन मी लगेच वर पाहिलं. ऐव्हाना रिया स्टेजवर पोहचली देखील होती. स्टेजवरून सगळी माझ्याकडे पाहत होती. आजुबाजुंची सगळी मुलं देखील माझ्याकडेच पाहत होती. बाजूला बसलेल्या मुलाने कोपरा मारून मला उठायची खून केली. " अरे जा ना पुढे, तुझं नाव announce झालंय ". " खरं ?? ", मी डोळे पुसत म्हणालो. " जयेश सरपोतदार ", माझं नाव परत एकदा announce झालं. मी लगेच घाईघाईत उठलो आणि स्टेज कडे लगबगीने जायला लागलो. पायरी चढताना एकदा अडखळलो पण लगेच स्वतःला सावरलं आणि स्टेजवर आलो. माझा आणखीन माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता.
माझा interview घेतलेल्या HR ने माईक हातात घेतला आणि म्हणाला, " I must say, he has excellent presence of mind, this was my favourite interview of the डे ". लगेच खाली बसलेले मुलं टाळ्या वाजवायला लागली. मी बावरून रियाच्या बाजूला जाऊन उभा राहीलो. रियाने लगेच मला congratulate केलं. " म्हटलेलं ना तुला चांगला दिला होता तू interview, उगाचच काळजी करत बसलेलास ", ती माझ्याकडे पाहत हसत म्हणाली. " अरे हो, पण ते तर एकच घेणार होते ना दोघांतून ", मी माझे अद्याप ओले असलेले डोळे पुसत आणि काहीसे हसत विचारले. " ते म्हणायचं असतं रे फक्त प्रेशर टाकण्यासाठी आणि शेवटी ऐकलं नाही का ? त्यांना तुझा presence of mind आवडलं ते ", ती माझ्याकडे पाहत म्हणाली. मी केवळ मान हलवली आणि होकार दर्शविला. आता जास्त काही बोलू शकेल असं वाटत नव्हतं.
समोर फोटोग्राफर आमचा सर्वांचा ग्रुप फोटो काढत होता. पण त्याच्याकडे माझे लक्ष नव्हते ; मी माझ्याच जगात हरवलो होतो. या क्षणाची वाट मी किती दिवसांपासून पाहत होतो. खरं तर या क्षणाची अपेक्षा पण सोडून दिली होती. पण देव देतो तेव्हा भरभरून देतो हे जे म्हणतात ते काही खोटं नाही. आज कंपनी पण भेटली होती आणि सोबत रिया पण त्याच कंपनी मध्ये ; ते देखील आता अनोळखी म्हणून नाही तर आता मित्र म्हणून आम्ही सोबत असणार होतो. कदाचित याआधी ७ कंपन्या यासाठी रिजेक्ट झालो असेल की आज या दिवशी रिया सोबत एकाच कंपनी मध्ये प्लेस होणार होतो. कधीकधी ना उगीच आपण नशिबाला कोसतो, देवाला नावे ठेवतो ; पण कधी त्याच्यावर पण विश्वास ठेवायला हवा. एखादी गोष्ट नाही झाली वा नाही मिळाली तर काय झालं ; काय माहित नशिबात त्याहीपेक्षा काहीतरी मोठे, आणखीन चांगले लिहून ठेवले असेल. आज हातात जॉब पण होती आणि सोबत रिया पण होती. मी एकदा रियाकडे पाहिले आणि एकदा समोर बसलेल्या सर्व मुलांकडे पाहिले आणि डोळे मिटून घेतले. हा क्षण मला पूर्णपणे अनुभवायचा होता. आयुष्यात कधीच विसरायचा नव्ह्ता...कधीच म्हणजे कधीच नाही.....
DO READ, SHARE and DO NOT FORGET TO SUBSCRIBE
Credits :
Typing - Vaishnavi Kapratwar
Poster - Shubham Helaskar

👌👌👌👌
ReplyDeleteChan
ReplyDelete🔥🔥🔥
ReplyDeleteDon👌👌👌
ReplyDeleteKhatarnaak
ReplyDelete