स्टोरीमध्ये TWIST
75% ATTENDANCE
PLACEMENT SEASON - PART02
PLACEMENT...... एवढा जीव अडकला होता ना या शब्दामध्ये. २ महिन्यांपूर्वी वाटलं होतं की प्लेसमेंट तर आपलं होईलच. पण आता नाकी नऊ आले होते आणि नवीन कंपनी आली म्हणलं तरी देऊ वाटत नव्हती. सारा उत्साह गेला होता. ७ कंपन्यांतून रिजेक्ट झाल्यावर आता उत्साह तो राहील तरी कसा? विन्या आणि दिन्या तर त्यांच्या ३-४ कंपनी मध्येच प्लेस झाले. असं नाही की त्यांनी काही फार जास्ती अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी सोबतच कंपन्या यायच्या १ महिन्यापूर्वी प्लेसमेंट साठी अभ्यासाला हात लावला होता. पण साले दोघे लवकर प्लेस पण झाले आणि मी एकटा इकडे अडकलो. रूम मध्ये ४ था विकास पण होता ; न प्लेस झालेला. पण तो गिनती मध्येच नव्हता. दिवसभर रीडिंग रूम मध्ये पडलेला असायचा. प्लेसमेंट द्यायचीच नाही म्हणून त्याने मनावर घेतलेलं. मागची २ वर्ष MPSC द्यायची म्हणून अभ्यास करत बसलेला. आता GATE देतो म्हणून त्याचा अभ्यास करत बसलेला. मधातच कधी तरी काय झालं काय माहित, एमबीए करायचं म्हणून पुण्यात क्लास करून आलेला. त्याच काहीतरी वेगळच चालायचं. सगळ करून बसला पण प्लेसमेंटला नाही बसला. त्याच्या मते ही छोटी स्वप्ने होती. असो त्याची मते त्याच्याकडेच. आता इकडे टेन्शन आलं होतं की माझ्या पोटा-पाण्याच कस सांभाळू. इतर पोर बॅकअप म्हणून आणखीन एक कंपनी करत होती आणि काढून ठेवत होती आणि मला तर साधी एक पण मिळत नव्हती.
“ बास झालं आता ”, मी जोरात ओरडलो. PUBG खेळत असलेल्या विन्याने गेम थांबवला आणि movie पाहत बसलेल्या दिन्याने कानातून हेडफोन काढले. दोघेही माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहायला लागले. ” बास मी काही आता कंपनीला बसणार नाही ” मी परत एकदा जोरात ओरडून बोललो. विनेश आणि दीन्या दोघे एकमेकांकडे पाहायला लागले आणि त्यांनतर एकसोबतच त्यांनी माझ्याकडे पाहिलं. मी पण दोघांकडे पाहिलं आणि नंतर मान खाली घालून बोलायला लागलो, " बास झालं रे आता. तुम्ही दोघं बसलाय निवांत गेम खेळत अन मुव्ही पाहत. झालात प्लेस एकदाचे. आणि मी ? मी काय करू? इतक्या कंपन्या आल्या अन गेल्या पण. अख्खा गाव प्लेस होत आहे आणि मी आणखीन असाच बसलोय. मी ठरवलय मी काही देत नसतो कंपनी आता ”. असं म्हणुन मी रूमच्या बाहेर चालायला लागलो. लगेच मागे विन्या आणि दिन्या पण माझ्या मागे धावत आले. दिन्या ने माझ्या गळ्यात हात घातला आणि, " इकडे बाहेर तमाशा करू नकोस ", असे म्हणून ओढत रूम मध्ये घेऊन आला. " काय नाटकी चालू आहेत रे तुझी ! ", विनेश माझ्यावर ओरडला. " प्लेसमेंटला नाही बसत म्हणजे ! काय झालं मला नीट सांग ", दिन्याने शांतपणे मला विचारल. मी आतापर्यंत मला सतावत असलेले सर्व मुद्दे त्याला सविस्तर सांगितले की कसा मी पूर्णपणे demotivate झालोय आणि आता आणखीन एक rejection मला सहन नाही होणार.
" तू कसा काय demotivate होऊ शकतोस. प्लेसमेंट सुरु केल होत तेव्हा सगळ्यात positive vibes तुझ्यातच होत्या. आम्ही दोघांनी कुठे आधीच give up केल होत. पण तू जे motivational speech दिलेलं तेव्हा कुठे हिमतीने अभ्यासाला सुरुवात केलेली ", दिनेश मला समजावत म्हणाला. पण मी काही ऐकायच्या मूड मध्ये न्हवतोच. Motivation पण एक वेळेपर्यंतच कामाला येत ; त्यानंतर त्या फक्त काही ओळी बनून राहतात. त्यांचा काहीच अर्थ नसतो आणि मी आता त्या पॉईंटच्या पुढे आलो होतो. त्यांनी सांगितलेलं सर्व समजत तर होत पण आता उमजत काहीच नव्हतं. "अपयश येत पण माणसाने थकून बसायच नसतं, परत उठायचं असत आणि लढा द्यायचा असतो ". हो बाबा पटत, पण किती वेळा उठू? पडत तर परत आहेच मी परत परत. आता परत उठायचा पण कंटाळा आलाय. त्यापेक्षा बसतो मी खालीच.
विन्या कडे पाहून मी म्हणालो, " माहिती मागच्या वेळेस अगदी थोडक्यात HR गेला. HR मधून हाकललेल. किती वाईट वाटलं म्हणून सांगू. अगदी रडायला आलेल मला. TPO च्या बाहेर पडलो, ग्राउंडकडे गेलो तर तिथे zonal ची मॅच सुरु होती. मंदिरात पण कोण २ couple होते का काय माहित नाही पण बसलेली. शेवटी इंजिनजवळ असलेल्या विहिरीकडे एकांत भेटला आणि तिथे जे रडलोय म्हणून सांगू. अश्रूंच्या धारा वाहत होत्या अगदी ". मी आपली दुःखभरी कहाणी त्या दोघांना सांगत होतो. विन्या माझ्याकडे पाहून म्हणाला," इतके परके आहोत का आम्ही तुला जया? आम्हाला बोलला असतास आधीच हे सर्व. तुला काय वाटलं आम्ही तुझी चेष्टा करू? इतकच ओळखतॊस का आम्हाला? ", खिन्न स्वरात विन्या म्हणाला. " नाही रे विन्या, पण तुमच्यासमोर रडू शकत नाही ना! ", मी स्वतःला defend करत बोललो.
"बर चल ते सर्व सोड आता. उद्या TechnoStat येणार आहे आणि तू त्याला बसणार आहेस", दिनेश awkward होत चाललेल आमच conversation तोडत म्हणाला. "पण ...", मी काही बोलणार इतक्यात माझ बोलणं तोडत दिनेश म्हणला, " पण बिन काही नाही. तूला आठवत आपण analysis केलं होत प्लेसमेंट सुरु होन्याधी. त्यानुसार पहिल्या फेज मधे सगळी अभ्यासु पोर प्लेस होतात ज्यांनी वर्षभर खूप अभ्यास केलेला असतो. आपलं काय ठरलेलं? या फेज मध्ये आपण फक्त वाट पाहू ; कारण या phase मध्ये आपले चांसेस देखील फार कमी होते. पण त्यानंतर जेव्हा ही सगळी घासू अभ्यासु पोरं प्लेस होतील तेव्हा ? आणि मग कंपन्या येतील तेव्हा ? तेव्हा आपला खरा वेळ येणार आणि मग सारं रानच आपलं. असेलच कोण आपल्यापुढे? उठ खुळ्या हीच ती वेळ आहे. आता आपणच आहोत. आता आपल्यालाच मिळणार कंपनी. आता नाही म्हणून चालणार नाही. ७ कंपन्या झाल्या ना तुझ्या, उद्या फक्त apti क्लिअर कर म्हणजे झाल. तुझी साडेसाती संपली, होणार का नाही बघू तू उद्या प्लेस ". दिनेशचे ते motivational speech आता अगदी काळजाला छेदत होत. नसातला सळसळणारा रक्तप्रवाह मला अगदी जाणवत होता. खाली बसलेला मी उठलो आणि टी-शर्टच्या स्लिव्हस वर करून म्हणालो," आता पाहूच कस होत नाही माझ प्लेसमेंट ". " Thats our boy ", माझ्या पाठीवर जोरात थाप देत विन्या ओरडला. मी लगेच फोन घेतला, कंपनी साठी apply केलं आणि लॅपटॉप बॅग घेऊन लॅब कडे अभ्यासाला निघालो.
*********************************************
विनेश म्हणाला होता,' साडेसाती संपली की चांगली वेळ सुरू होते '. माझ्या ७ कंपन्या आतापर्यंत देऊन झाल्या होत्या. या कंपनीची apti क्लिअर झाली होती म्हणजेच अर्धी लढाई इथे झाली होती. Hope आता येणारा वेळ चांगला असावा. मी विचार करत TPO मध्ये चेअरवर बसलो होतो. पहिल्या कंपनी वेळेस interview साठी बसलो होतो तेव्हा मला आठवत की कसा AC सुरू असून देखील घाम सुटला होता. हात थरथरत होते, बोलताना शब्द अडखळत होते. पण आता ; आता काय हे सगळ नेहमीचच झालं होतं. सवय झाली होती या सगळ्याची. "जयेश सरपोतदार...", माझ नाव announce झालं. लगबगीने मी आत गेलो.
नेहमीप्रमाणे २ जण बसले होतेच interview घेण्यासाठी. त्यांनी माझा resume घेतला आणि स्वतःला introduce करायला सांगितलं. मी आपलं नेहमी सारखच तेच उत्तर दिलं. मागच्या interview च्या वेळेस hobbies n interest सांगणार म्हणलं की थांबवलेलं ; म्हणून यावेळेस सांगितलेच नाही. त्यांनी JAVA वर प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रश्न काहीच नवीन नव्हते. मागच्या कंपन्यांना काही सोडले तर थोडयाफार फरकाने हेच प्रश्न विचारले होते. आता हे repeat इतके झाले होते की अगदी पाठच झाले होते. OOPs च्या concepts ते विचारत होते. मी त्यांना उत्तरात exception सहीत explain करत होतो. त्यांना जेव्हा वाटलं की JAVA मध्ये तर हा ओके आहे. ते वळले प्रोजेक्ट्स कडे. त्यात काही अवघड नव्हतच मुळी. सुरुवातीच्या कंपन्यांना मला हे पण माहिती नव्हत की प्रोजेक्ट्स वर प्रश्न विचारतात तरी नेमके कसे. मी वेड्यांसारखं केवळ synopsis वाचून येत होतो. पण जेव्हा कळलं त्यानंतर सगळं प्रोजेक्टच सारं implementation with detail architecture and diagrams काढून समजावून घेतल. त्यांनी साधा प्रश्न जरी विचारला तरी मी तो architecture diagram काढून explain करत होतो. त्यामुळे त्यांना वाटत होतं की मी फारच logically काम करतो. Technical interview तर छान गेला. त्यांनी शेवटी मला जाताना सांगितलं देखील की त्यांना माझा कॉन्फिडन्स आणि माझी बॉडी लँग्वेज फारच आवडली. पण मला याच काहीच वाटलं नाही. या क्षणाला मला एकाच प्रश्र्नाच्या उत्तरात इंटरेस्ट होता तो म्हणजे तुम्ही मला आज घेणार की नाही ते. पण हे कुठे लगेच त्यांना विचारू शकत होतो. तिथूनच हाकललं असत मला. ५ मिनिटे बाहेर वाट पाहिल्यावर मला coordinator ने मेसेज पास केला की लगेच HR होणार आहे माझा.
मी लागलीच सेल्फी कॅमेरा मध्ये पाहून केस सेट केले. फाईल एकदाची चाळली आणि एक मोठा श्वास घेऊन आत गेलो. आत HR मॅनेजर बसला होता. त्याने इशारा करून त्याच्यासमोरच असलेल्या चेअरवर बसण्यास सांगितले. स्वतःला introduce करणार इतक्यात माझ्याकडे हात दाखवून त्यांनी मला थांबण्यासाठी इशारा केला. " Wait, we are not starting yet ", हातात असलेला मोबाईल चाळत ते बोलले. " मग बोलावलंय कशासाठी ? ". मी मनातल्या मनात पुटपटलो. " May I come in sir ", माझ्या अगदीच मागे असलेल्या door मधून एकदम नाजुक, अगदी मृदू आणि कोमल आवाज आला. नाजुक, मृदू आणि कोमल या तिन्ही शब्दांचा अर्थ एकच होतो. पण तो आवाज describe करण्यासाठी या तिन्ही शब्दांची गरज होती. तो मधुर आवाज मी ओळखत होतो आणि मी मागे वळून न पाहता देखील सांगू शकत होतो की १०० टक्के हा तिचाच आवाज आहे. हळू हळू पावले टाकत ती पुढे आली. HR ने तिला माझ्या बाजूची सीट ऑफर केली तशी ती बसली. काहीशी हिम्मत करून वळून मी माझ्या उजवीकडे म्हणजेच तिच्याकडे पाहिलं आणि हो!! ती तीच होती. मागच्या वेळेस २nd year ला असताना ट्रेन मध्ये सोबत बसलो होतो. त्यांनतर तिच्याशी ना माझी बोलायची परत हिम्मत झाली ना कधी तशी संधी आली. इतका वेळ नॉर्मल असणारा माझा heartbeat परत वाढला. माहिती नाही असं का होतं ? पण ती समोर आल्यावर माझ्यासोबत असं नेहमीच होतं.
HR ची नजर चुकवून मी परत एकदा तिच्याकडे पाहिलं. त्याच वेळी तिने देखील माझ्याकडे पाहिलं आणि नजरभेट झाली. माझ्याकडे पाहून तिने तिची ती signature smile दिली जिच्या मागे मी मागची 3 वर्ष खुळा होतो. असं नाही की कधी पहिली नव्हती पण इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहीली होती. माझे काय हाल झाले असतील ते आता शब्दात सांगणं कठीण आहे पण माझ्या काही heartbeats स्किप झाल्या हे मी नक्की सांगू शकतो. " here... pay attention please", टेबलं वर हात मारून HR ने जोरात आवाज केला आणि मी भानावर आलो. काय छान moment झाला होता. इथे interview देण्यासाठी बसलोय हे क्षणभर विसरलोच होतो मी.
"तुमच्या दोघांचा Technical interview तर फारच चांगला झाला", HR आमच्याकडे पाहून बोलायला लागले. " आता हा शेवटचा interview असेल. पण त्यापूर्वी हा interview कसा होईल हे मी क्लिअर करतो. आपला हा HR राऊंड नेहमी प्रमाणे होणार नाही आणि मी पण घेणार नाही " , " आता हा काय नवीन बॉम्ब टाकणार आहे ", मी मनातल्या मनात पुटपुटलो. " हा राऊंड तुम्ही घ्यायचा आहे. मी 10 मिनिटे प्रत्येकाला allot करेल. पहिल्या राऊंड मध्ये ती तुझा interview घेईल आणि सेकंड राऊंड मध्ये तू तिचा. बाकी HR राऊंड तर तुम्हाला माहीतच आहे कसा असतो ते. अगदी प्रोफेशनल वाटायला हवा आणि लक्षात ठेवा शेवटी तुमच्या दोघांमधून एकच सिलेक्ट होईल आज ". आवाज आला नाही मात्र बॉम्ब खरंच फुटला होता. अगदी पेचप्रसंगच म्हणायचं हा. धर्मसंकट म्हणायचं ते यालाच का? एका बाजूला प्रेमधर्म होता. भले एकतर्फा होता पण कॉलेजला आल्यापासून नित्यनेमाने खंड ना पडू देता पाळला होता आणि एका बाजूला होतं प्रोफेशन, करिअर जे पुढची आयुष्य तेच निभवायच होतं. आणि मी असहाय योध्दा खुर्चीवर बसून एकदा HR कडे पाहत होतो आणि एकदा माझ्या बाजूलाच बसलेल्या तिच्याकडे.आज दोघांपैकी एक काही तरी निवडायचं होतं. स्टोरी मध्ये फार मोठा twist आला होता. मी एक दीर्घ श्वास घेतला.......
..........TO BE CONTINUED
SUBSCRIBE, COMMENT AND SHARE …!!
Credits :
Edit - Vaishnavi Kapratwar
Poster - Shubham Helaskar

Bahot sahi ��
ReplyDelete🔥🔥🔥
ReplyDelete🔥🔥🔥.... Ly bhari
ReplyDelete