Posts

स्टोरीमध्ये TWIST

Image
  75% ATTENDANCE        PLACEMENT SEASON - PART02   PLACEMENT...... एवढा जीव अडकला होता ना या शब्दामध्ये. २ महिन्यांपूर्वी वाटलं होतं की प्लेसमेंट तर आपलं होईलच. पण आता नाकी नऊ आले होते आणि नवीन कंपनी आली म्हणलं तरी देऊ वाटत नव्हती. सारा उत्साह गेला होता. ७ कंपन्यांतून रिजेक्ट  झाल्यावर आता उत्साह तो राहील तरी कसा? विन्या आणि दिन्या तर त्यांच्या ३-४ कंपनी मध्येच प्लेस झाले. असं नाही की त्यांनी काही फार जास्ती अभ्यास केला होता. आम्ही सगळ्यांनी सोबतच कंपन्या यायच्या १ महिन्यापूर्वी प्लेसमेंट साठी अभ्यासाला हात लावला होता. पण साले दोघे लवकर प्लेस पण झाले आणि मी एकटा इकडे अडकलो. रूम मध्ये ४ था विकास पण होता ; न प्लेस झालेला. पण तो गिनती मध्येच नव्हता. दिवसभर रीडिंग रूम  मध्ये पडलेला असायचा. प्लेसमेंट द्यायचीच नाही म्हणून त्याने मनावर घेतलेलं. मागची २ वर्ष MPSC द्यायची म्हणून अभ्यास करत बसलेला. आता GATE देतो म्हणून त्याचा अभ्यास करत बसलेला. मधातच कधी तरी काय झालं काय माहित, एमबीए करायचं म्हणून पुण्यात क्लास करून आलेला. त्याच काहीतरी वेग...

ये जंग तो जितनी ही है .......

Image
सबर  कर  ले  तू  जरा   पता  है  मोहल्ले  में   तेरी  बड़ी  पहचान  है   पर   situation  समझ  बेटा घर  से  ना  निकल  बाहर  जान  है  तो  ही  जहाँ  है   डट  के  करेंगे  इस  वायरस  का  सामना   लेकिन  खुले  मैदान  में  निकल  के  नहीं   लड़ना  है  इस  शैतान  से  तो   अपना  मकान  ही  सबसे  जगह  सही   कुछ  दिन  घर  से   नहीं  निकला  तू   बाहर    तो  क्या  तेरी  ज़िंदगी  रुक  जायेगी ?   थम  जायेगी ?   खत्म  हो  जायेगी ? कुछ  बिगड़ेगा  नहीं  तेरा   लेकिन  तेरी  ये  पहल  chain  तोड़के  आगे  कई...

शेवटी भेटली ती !!

Image
  75% ATTENDANCE        END OF PLACEMENT SEASON     रिया .....रिया पाटणकर. नावातच किती गोडवा आहे ना !! हे होतं आमच्या क्लासमधील बहुतांश मुलांचं regular लेक्चर अटेंड करण्याच कारण. नाहीतर रोज सकाळी कोण ८ वाजता उठेल ते बोरिंग लेक्चर अटेंड करण्यासाठी. फळ्यासमोरचा कंटाळवाणा चेहरा पाहून अगदी झोप यायला लागल्यावर २ क्षण जरी तो सुंदर चेहरा पाहिला तरी ते संपूर्ण लेक्चर झेलण्याची क्षमता यायची. कदाचित त्यामुळेच आमच्या क्लासमध्ये इतर डिपार्टमेंटपेक्षा प्रत्येक सेमला defaulter कमी असावेत. शांत आणि नेहमी अबोल असणारी ती मुलांशी क्वचितच बोले. First Year पासूनच ती माझं crush. पण तिथे पण मी काही एकटा नव्हतो. कॉलेजमध्ये कितीतरी जणांची ती crush होती. पण जिथे सिनिअर्सला देखील भाव ना टाकणारी ती माझ्याशी का बोलेल? या न्यूनगंडापायी तिच्याशी बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही. 2nd year ला असताना एकदा ट्रेन मध्ये सोबत आलो होतो. त्यांनतर तिच्याशी बोलण्याचा प्रसंगच काही आला नाही ना कधी माझी तिच्याशी बोलण्याची हिम्मत झाली.      ...

आणखीन एक Rejection

Image
                                                   75% ATTENDANCE                                                   PLACEMENT SEASON          अलार्मच्या कर्कश आवाजाने डोळे उघडले. घड्याळात पाहीले तर ७. ३८ झाले होते. ७ चा अलार्म लावलेला खरा पण वेळेवर जाग येईल तो मी कसला. त्यात रात्री झोपायला पण उशीर झालेला. Data Structure जे revise करायचं होतं. काल रात्री २ topics revise करायचे राहीले होते. म्हटलं सकाळी लवकर उठून करता येतील ; पण आता वेळ कुठे होता? ८ वाजता तर TPO ला  interview साठी पोहचायचं होत. काल apti झाली, त्यात शॉर्टलिस्ट झालो. आज त्या कंपनीचा interview होता. वेळ पाहून मी लगबगीने उठलो. घाईत तोंडावर पाणी मारलं, हातानेच केस सेट केले. बेड खाली पडलेली पॅन्ट घातली. त्यात...

राक्षस !!

Image
                                          (75% ATTENDANCE - PART 05)                                                    END OF THE SEASON             वेळ सकाळची. लेक्चरला आणखीन १५ मिनिटे होती. मी म्हटलं इतक्या वेळात आपला चहा पिऊनही होईल. असही लवकर जाऊन काही त्या सरांच लेक्चर अटेंड करण्यात माझा काहीच इंटरेस्ट नव्हता पण 75% Attendance भरायची होती ना...! म्हणून लेक्चर करणे तर भागच होते. मी आपलं कँटीन मध्ये आलो. चहा घेतला आणि टेबल कडे वळलो. तेथे पाहतो तर  कोपऱ्यात विन्या बसलेला दिसला. मी जाऊन त्याच्या समोरील खुर्चीवर बसलो. काहीतरी विचारात तो असावा, कारण एकटक शून्य दृष्टीत तो पाहत बसला होता. त्याचे लाल डोळे रात्री त्याची पुरेशी झोप न झाल्याची साक्ष देत होते. मी जाऊन त्याच्या समोर ...

Inferiority Complex !!

Image
                                         (75% ATTENDANCE - PART 04 )     उन्हाळ्यात रेल्वेचा प्रवास, त्यात खिडकीची सीट. कानात हेडफोन होता आणि त्यावर coldplay ची प्लेलिस्ट चालू होती. रेल्वे वेगाने धावत होती आणि त्या गर्मीत खिडकीतून येणारा वारा चेहऱ्याला स्पर्श करून जाताना स्वर्ग प्राप्तीची अनुभूती करून देत होता. मी माझे डोळे बंद करून माझ्या वेगळ्या जगात रमलो होतो. आयुष्यात यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही अस मला वाटत होत. माझं हे सुंदर स्वप्न माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या पाण्याच्या काही थेंबामुळे खंडित झालं. पण १ मिनिट .....उन्हाळ्यात पाऊस कसला? मी डोळे उघडले आणि समोर पाहतो तर काय, माझ्या समोर बसलेले काका वा मामा काय म्हणतात ते ; गुटखा खाऊन खिडकीतून बाहेर पिचकारी मारत होते आणि वाऱ्यामुळे ते तुषार माझ्या अंगाकडे येत होते. ईईईई !!! मला माझीच किळस आली. मी माझे हेडफोन काढले आणि मराठी अक्सेंट असलेल्या हिंदीत म्हणालो,"  ओ काका, क्या कर राहे हो ? बाहेर मत...