उमेद
धावताना कधी ठेच लागली
तर माणूस अडखळून पडतो
त्यातही जखमेतून रक्त येऊ लागले
तर वेदनेच्या त्रासाने विव्हळतो
पण धावण्याची ईच्छाच त्याची
त्याला दगड काय रोखू शकेल
रक्ताचीच शपथ घेऊन
जागेवरून तो उठतो
आणि परत धावण्यासाठी
तो आणखीनच सज्ज होतो
रस्ता जरी त्याचा नसला
तरी ध्येय त्याचे पक्के असते
जिकंण्याची उमेद त्याची
त्यालाच ती प्राप्त होते ....!!!
: मयूर लाभशेटवार

👌👌👌
ReplyDeleteSundar
ReplyDeleteChaan bhau
ReplyDelete