यंदा आमची बारावी होती. काय थकवणार वर्ष होत हे! दहावी झाली; आता चांगले दिवस येतील अस वाटत होत. मोदीजींनी सांगितलेले 'अच्छे दिन ' हेच असावेत या आनंदात होतो आम्ही, पण दहावीनंतरचा हा आनंद जास्त काळ नाही टिकला. फार फार तर रिझल्टच्या नंतर महिनाभरापर्यंत काय ती मोकळीक होती ; त्यानंतर तर जेवणाची पण उसंत नाही भेटायची. दहावीचा रिझल्ट आला, चांगले ९४ % पडले होते. ९० च्या वर पडले म्हणजे आमच्या येथे तो मुलगा हुशार कॅटेगरी मध्ये मोडतो,आणि हुशार मुलांनी १२ ला सायन्स घ्यायचं ही आमच्या गावची परंपरा होती. बायो आणि मॅथ्स असे १२ ला दोन गट पडतात, म्हणजे डॉक्टर नाहीतर इंजिनीअर ; या पेक्षा काही वेगळं सांगितलंच जात नाही, आणि त्यातल्या त्यात हुशार कॅटेगरी वाल्या पोरांनी बायो घ्यायचं हा ट्रेंड ठरलेला. कारण " इंजिनीअर काय बनतो, घरा घरामध्ये झालेत इंजिनीअर त्यापेक्षा डॉक्टर बन, घराच नाव कमावशील" अस म्हणून PCB ग्रुप ला ढकलल जायच. ...
Bhau far chhan
ReplyDelete#inspiring
ReplyDeleteसुपर
ReplyDeleteLay bhari mayur dada
ReplyDelete