आणखीन एक Rejection
75% ATTENDANCE PLACEMENT SEASON अलार्मच्या कर्कश आवाजाने डोळे उघडले. घड्याळात पाहीले तर ७. ३८ झाले होते. ७ चा अलार्म लावलेला खरा पण वेळेवर जाग येईल तो मी कसला. त्यात रात्री झोपायला पण उशीर झालेला. Data Structure जे revise करायचं होतं. काल रात्री २ topics revise करायचे राहीले होते. म्हटलं सकाळी लवकर उठून करता येतील ; पण आता वेळ कुठे होता? ८ वाजता तर TPO ला interview साठी पोहचायचं होत. काल apti झाली, त्यात शॉर्टलिस्ट झालो. आज त्या कंपनीचा interview होता. वेळ पाहून मी लगबगीने उठलो. घाईत तोंडावर पाणी मारलं, हातानेच केस सेट केले. बेड खाली पडलेली पॅन्ट घातली. त्यात...