'पुन्हा कधी हात पण लावणार नाही'
( 75% ATTENDANCE PART -02)
मंजू वरील सकाळचा चहा म्हणजे अमृत... मी आणि विनय अमृत म्हणजेच चहाचा आस्वाद घेत बसलो होतो. डिसेंबरच्या थंडीत तो चहा म्हणजे काही अमृतापेक्षा कमी नव्हता. माझा एक कप संपला आणि दुसरा कप घ्यायचा मोह मला काही आवरला नाही. मी आणखीन एक चहा घेतला. "दारू पिण्याच्या वयात चहा काय पीत बसले आहात. लहान मुलं कुठली ? " अस म्हणून समोरच लाकडाच्या बुंध्यावर बसलेला चिन्या दा हसायला लागला. चिन्या दा म्हणजेच आमचा सिनियर. "ए चिन्या दा, मला काही पण बोल पण चहाला काही नाही बोलायचं हा, आणि दारूच काय बोलतो तू? आम्ही आजपर्यंत कधी घेतली नाही. पहिली दारू कधी स्वतःच्या पैशाने प्यायची नसते असे म्हणतात, तर सिनियर या नात्याने आम्हाला दारू पिऊ घालणे तुझे कर्तव्य आहे. तू कधी बजावणार तुझे कर्तव्य?" विनेश हे सहजच चेष्टेत बोलत होता पण कदाचित शेवटचं वाक्य चिन्या दा च्या मनाला छेदून गेल असावं. "असं म्हणतोस, तर चल आज ३१'st च आहे, अगदी मुहूर्तच. काय म्हणतो करायचा आज शुभारंभ?". विनय एक क्षण थबकला आणि माझी सहमती जाणण्यासाठी त्याने माझ्याकडे पाहीले. क्षणभर मला हो म्हणायची ईच्छा तर झाली पण माझी मान काही हालत नव्हती. चिन्या दा माझ्याकडे वळून म्हणाला, "अरे विचार काय करत बसला आहेस जया, हो म्हणून टाक ना?". "चल ना जया मजा येईल", विन्या पण आता मागेच लागला. शेवटी त्या दोघांच्या उत्साहापुढे मला झुकावेच लागले. "ठीक आहे" इतके म्हणून मी शांतपणे माझी मान हलवली.
Stock ची व्यवस्था करण्याची जबाबदारी चिन्या दा ने स्वतःकडे घेतली आणि पोर जमवायचे काम विनय अन माझ्याकडे आले. मुलं तर जमवावीच लागणार होती कारण त्यामुळे खिश्यावरचा भार काहीसा हलका झाला असता. आम्ही लागलीच काही contacts मिळवले आणि शेवटी सौरव आणि हृतिक यायला तयार झाले. वेळ ठरली रात्री ११.३० वाजताची आणि ठिकाण ठरला ग्राऊंडच्या Track वरील वडाचं झाड कारण एक तर रात्री तिथे पूर्ण अंधार असायचा आणि रात्री कोणी तिकडे फिरकत पण नसायचं. हॉस्टेल पेक्षा तीच जागा अधिक सुरक्षित राहिली असती. वेळ ठरली तसे मुलं पण जमली. हृतिक सोबत हरीश पण आला होता. यामुळे जरा contri चा भार पण आणखीनच हलका झाला पण ज्याची आम्ही वाट पाहत बसलो होतो त्या चिन्या दा चा काहीच पत्ता दिसत नव्हता. लवकरच तो पण आला. आल्या आल्या त्याने वेळ न दवडता लगेच ५ ग्लासेस सोडले आणि त्यात अर्ध्या पेक्षा जास्त दारू ओतली. हरीशच्या नावाचा ग्लास नियोजनात नसल्याने त्याला direct बाटलीच हातात दिली. "भावा खरं काही होणार तर नाही ना ?" सौरव काहीश्या चिंतेच्या स्वरात विचारले. "तू घाबरत काय आहेस, दूध पिणारा बाळ आहेस का आता, डोळे बंद कर आणि पी गटकुन." चिन्या दा इकडे आपल्या उपहासात्मक शब्दांनी पोरांना फुल्ल motivate करत होता. तसं चिन्या दा सोडला तर आमची सर्वांची First time च होती पण या सर्वांत मी आणि हरीश सगळ्यात जास्त nervous होतो.
मी ग्लास तोंडाला लावला आणि एक घोट घेतली. घेतली आणि घेतली तशी बाहेर थुंकून पण दिली. किती कडवट होती ती. "लोक कशी पितात ही काय माहित?" मी स्वतःशीच पुटपुटलो. सगळी जण माझ्याकडे पाहून हसायला लागली, मी काहीसा वरमलो. सर्व जण तोंड खराब करून कसेबसे आपला ग्लास संपवत होते. ऐव्हाना चिन्या दा चा ग्लास संपून त्यानं दुसरी बाटली पण काढून ठेवली आणि आमचे ग्लास संपण्याचे वाट पाहत बसला. तेवढ्यात कॅन्टीन च्या बाजूने कोणीतरी बॅटरीचा strong flash आमच्यावर टाकला. हृतिक त्रासून जोरात ओरडला "कोण आहे रे?" तिकडून सेम वाक्य ऐकू आलं "कोण आहे रे तिकडे?" ते देखील अगदी भरीव आवाजात आणि त्यांनतर जो शिटीचा आवाज ऐकू आला त्यावर आमचीच काय चिन्या दा ची पण फाटली कारण ती शिटी security वाल्या मोरे मामांची होती. ऐरव्ही या शिटीला मुलं घाबरली नसती पण या वेळी आम्ही Red handed पकडले गेले असतो. मी चिन्या दा कडे पाहून म्हणालो "आता काय?" चिन्या दा माझ्याकडे खंबीर नजरेने पाहून म्हणाला "काय आता... आता पळा." यानंतर चिन्या दा ती बाटली आणि बॅग तिथे टाकून जो पळाला, त्याच्या मागे मी आणि माझ्या मागे सर्वजण. मोरे मामा येत होते त्याच्या opposite direction ला असलेल्या quarters कडे आम्ही पळालो. Fitness का महत्वाची असते हे त्या दिवशी आमच्या लक्षात आलं. काहीसे वय झालेले मोरे मामा शिटी वाजवत आमच्या मागे धावत होते आणि आम्ही 6 जण वाऱ्याच्या वेगाने जिवाच्या आकांतेने त्या झुडुपांतून पळत सुटलो आणि मागच्या बाजूला असलेल्या कुंपणवजा सुरक्षारक्षक भिंत चढून कॉलेज बाहेर पडलो.
आता परत कॉलेज हॉस्टेल वर जाणं काही शक्य नव्हत कारण तिकडे आता कडक तपासणी झाली असती. सौरव हॉस्टेल वर राहत नव्हता, जवळच त्याचा फ्लॅट होता. शेवटी सर्वांनी सौरवच्या फ्लॅट वर आजची रात्र काढण्याचे ठरवले तेच सेफ असलं असत. तसं चकमा देऊन आम्ही कॉलेज बाहेर पडलो होतो खरं पण उद्या सकाळी हॉस्टेल वर जाणं तर भाग होतंच आणि उद्या सकाळी त्यांनी आम्हाला ओळखलं तर? भीती याची नव्हती की security वाल्या मामांनी पाहिलंय, भीती याची होती कि घरी कळलं तर काय होईल .आता मला खरंच भीती वाटत होती. ती रात्र कशीबशी सौरवच्या रूम वर घालवली आणि सकाळी तोंडावर पाणी मारून मी, विनय ,हृतिक आणि हरीश हॉस्टेल साठी निघालो.आता आमची खरी परीक्षा होती. Entrance ला मोरे मामाच होते उभे टाकलेले. मला क्षण भर वाटले की आता तर आपण गेलोच पण हिम्मत जुटवली आणि situation face करण्याचं ठरवलं. एक कटाक्ष नजरेने आमच्याकडे त्यांनी पाहीले. आम्ही न घाबरता तिकडे लक्ष न देता आत गेलो. कदाचित काल रात्री अंधारात त्यांनी आम्हाला नीट पाहीले नसावे. त्यांनी आम्हा ओळखलं नव्हत. फार थोडक्यात बचावलो होतो, नशीब आणखीन काय? मी सुटकेचा एक श्वास टाकला आणि तडक माझ्या रूम मध्ये गेलो. अशी धावपळीची रात्र घालावल्यांनंतर मी कॉट वर पडलो आणि झोपलो ते 'पुन्हा कधी दारूला हात लावणार नाही' ही शपथ घेऊनच..........
TO BE CONTINUED........

Interesting story Mayur👌👍😊
ReplyDeleteSlots - DrmCD
ReplyDelete› › 양산 출장마사지 Games › Table Games 경상남도 출장샵 › › Games 김포 출장샵 › Table Games Table Games. For many gamblers, poker and other games, it is one of the most 김천 출장마사지 popular types of table games, where you can bet money on a 화성 출장안마