येथे पण Struggle..!!
75% ATTENDANCE - PART 01
आज बऱ्याच दिवसानंतर घरातील अडगळीची खोली साफ करत होतो. बऱ्याच जुन्या वस्तू त्यांचं अस्तित्व काळाच्या ओघात आज पण टिकून आहे हे प्रकट करत होत्या. काही भांडीकुंडी, ४ पेट्या जुनी कापडी आणि एक बॅग भेटली. त्यातील ती बॅग मी हातात घेतली. धुळीने पार माखली होती ती, तिला झटकली तेव्हा धुळीचा पार लोळ उडाला. निरखून पाहिल्यावर मला लक्षात आल की, 'अरे ही तर आपली कॉलेजची बॅग !'. २०२० ला passout होऊन मला आज जवळपास ६ -७ वर्ष झाली होती, तरीपण ती बॅग पाहताच कॉलेजच्या त्या आठवणी परत जाग्या झाल्या. काही क्षणासाठी ते कॉलेजचे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहीले...भर शहरात असून देखील जंगलात असल्याचा feel देणारे ते आमचे वालचंद कॉलेज , सुरुवातीचे काही दिवस जड गेलेली पण चुटकी सरशी सरलेली ती Engineering ची ४ वर्ष, कॉलेजचा तो ट्रॅक, मेकअपला विषय काढण्यासाठी जागून काढलेल्या त्या उन्हाळी कम पावसाळी रात्री...आणखीन किती आठवणी होत्या. बॅग मधून एक एक वस्तू मी बाहेर काढत होतो, प्रत्येक वस्तू सोबत काही ना काही आठवणी जुडलेल्या होत्याच. त्यात मला एक डायरी सापडली. पाहताक्षणी मी ती ओळखली. अगदी काळजाच्या जवळ होती ती माझ्या मी कॉलेजला असताना . त्यात मी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवायचो. माझ्या ४ वर्षांच्या Engineering चा हा सारच जणू. मी सर्व काही बाजूला ठेवलं. बाजूच्या लाकडाच्या फळीवरची धूळ हातानेच साफ केली आणि तिथे बसून ती डायरीची पाने चाळायला सुरु केली .
लेक्चरचा time होऊन आता १५ मिनिटे झाली होती, पण सर आणखीन वर्गावर आले नव्हते. मुलांचा गोंधळ सुरु होता.काही मुले mini militia खेळण्यात व्यस्त होती, तर काही नुकत्याच काढलेल्या क्लास च्या Whatsapp ग्रुप वर हवा करण्यात व्यस्त होती. माझा या कोणत्याच गोष्टीत रस नसल्या कारणाने मी आपलं तोंड लटकावून मागच्या बाकावर बसलो होतो. कॉलेज सुरु होऊन महिना झाला असेल पण माझे आणखीन मित्र झाले नव्हते, तोंडओळखच झाली होती सर्वांसोबत पण माझे मन काही रमत नव्हते. माझ्या बाजूला बसलेला मुलगा मात्र चांगलाच तावात आला होता. Spot Round मध्ये त्याच नुकतच ऍडमिशन झालं होत, आणि कदाचित त्याचा आज पहिलाच दिवस असावा. late येणाऱ्या मुलींचा निरीक्षण करून तो त्यावर त्याची मते प्रदर्शत करत होता, जणू त्या ramp walk करणाऱ्या मॉडेल असाव्यात आणि हा competition चा जज आणि मी गरीब एकटा प्रेक्षक त्याचा हा खेळ पाहत बसलेलो. शेवटी सहजच मी त्याला त्याच नाव विचारलं. " विनेश मोहिते , मी लातूरचा आहे आणि तू ", प्रति उत्तरात त्याने मला विचारले. "मी , जयेश सरपोतदार , मी पण लातूरचाच आहे ", आणि झालं, मैत्री होण्यासाठी आमच्या दोघांत हा लातूर factor पुरेसा होता. पुढची २० मिनिटे आमचे लातूर पुराण चालू होतं, त्यात आमचे बरेच मित्र common पण निघाले. इतके दिवस आपण लातूरला कसे भेटलो नाही याचा आमच्या दोघांला पण नवल वाटत होतं.
अस बोलण्या बोलण्यात आमचा विषय निघाला की ‘ इंजिनीरिंग का घेतली ? ’. मागच्या काही दिवसात हा प्रश्न बऱ्याच वेळा मला विचारला गेला होता. " इंजिनीरिंगच का करायची आहे तुला ? ", "तु IT branch च का घेतली ?". याला उत्तरे पण ठरलेलीच होती ती अनुक्रमे ‘ Engineering सध्या चांगला career option आहे ‘ आणि ‘ IT branch ला Package चांगल भेटत ‘, पण खरं म्हणजे ‘ इंजिनीरिंग घेतली कारण medical पेक्षा आरामात असते ‘ आणि ‘ IT घेतली कारण CSE नाही भेटली '. तसं इतर कोणी विचारला असतं तर ठरलेली default उत्तरेच दिली असती पण विनय आता मित्र झाला होता तर त्याला खरं उत्तर दिल, " Engineering निवांत असते रे, सोपी असते म्हणून घेतली ".यावर विनेश हसायला लागला ,"तुला कोण म्हणलं इंजिनीरिंग निवांत आणि सोपी असते?". "का ? ते मेडिकल वाल्यांसारखं ५००-१००० पान पाठ करण्यापेक्षा तर सोपेच असेल की !". मी आपली बाजू defend करत म्हणालो.
यावर विनेश म्हणाला ," थांब भावा, मी सगळं calculation करून बसलोय.सांगतो तुला ऐक ". अस म्हणून आर्यभट्टांचे वंशज विनेश मोहिते यांनी आपले प्रमेय मांडायला सुरुवात केली. "प्रत्येक subject ची १ end sem, १ mid sem आणि internal evalution च्या २ ISE अश्या प्रत्येकी ४ exam झाल्या. प्रत्येक सेमला average पकड 6 विषय तर असतातच. म्हणजे प्रत्येक सेमला ४ * ६ असे २४ exam. इंजिनीरिंग ला असतात ८ सेम तर २४ * ८ म्हणजे १९२ परीक्षा ". " काय ...१९२ ?" मी अचंबित होऊन म्हणालो .
“ अरे थांब आता तर आणखीन बाकी आहे, lab कोण मोजणार ? “. हे calculation काही संपायचं नावच घेत नव्ह्त. ”लॅबची २ Internal ISE आणि १ external exam अश्या प्रत्येकी ३ exam. प्रत्येक सेमला २ lab म्हणजे प्रत्येक सेमला ६ exam. असे ८ सेम म्हणजे ६ * ८, ४८ लॅबच्या परीक्षा आहेत, तर आधीच्या १९२ आणि लॅबच्या ४८ तर total बघ २४० परीक्षा तुला द्यायच्या आहेत आता, यात assignment submissions तर मोजलेच नाहीयेत आणि प्रोजेक्ट चा तर वेगळाच विषय आहे आणखीन ". " का प्रोजेक्ट अवघड असतात का ? ", मी घाबरून विचारले. " मग सोपे असायला हे काय शाळेतील पर्यावरणाचे प्रोजेक्ट आहेत का ", विनेश अगदी भेदक आवाजात माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाला, ज्यामुळे आधीच घाबरलेला मी, माझे हृदयाचे धडधडणे आणखीच वाढले.
२४० हा आकडा ऐकून माझा तर mood च off झाला. यार , आधी कोणी का सांगत नाही हे. आधीच जे काही वर्गात शिकवत आहेत ते काही डोक्यात उतरत नव्ह्त. १ महिना झाला नाही कॉलेज सुरु होऊन त्यात Assignments चा ढीग लोड झाला होता या लहान जीवावर, त्यात या विनेश ने हे पुढचे ४ वर्षाचे calculations मांडून मोठा बॉम्बच फोडला होता. JEE ची २ वर्षे दीर्घ अग्नी परीक्षा दिल्यावर इथे आलो होतो. मला वाटलं होत येथे तरी काही आराम असेल, पण नाही आयुष्यात येथे पण struggle लिहिलेला होताच तर. आता जे आहे ते हेच आहे, दुसरा काही option आहे का माझ्याकडे. माझा तो दिवस हाच विचार करण्यात गेला " खरंच इंजिनीरिंग सोपी असते का ? "
.............TO BE CONTINUED
SUBSCRIBE , COMMENT AND SHARE …!!
STAY TUNED FOR NEXT PARTS

Ek no bhawa
ReplyDeleteMast ahe...
ReplyDelete❤❤🔥
ReplyDeleteAll that period went through my eyes. Ani 5 sem survive kelya baddal abhiman pan vatat aahe
ReplyDeletemast bro.......
ReplyDeleteखूप relatable आहे
ReplyDeleteRelatable AF
ReplyDeleteगंभीर मस्त रे..❤️❤️
ReplyDeleteNice Bro
ReplyDeleteसर्व प्रसंगाचे वर्णन खुपच सुंदर आहे. वाचताना अगदी जवळून अनुभवल्या सारखे वाटत होते. भारी
ReplyDeleteVery true yr Mayur ...Very nice 👌👍
ReplyDeleteBhari....👌👌
ReplyDelete����
ReplyDeleteMstch bhava....
ReplyDeleteअप्रतिम👌👌👌
ReplyDeleteजुन्या आठवणी पुन्हा जाग्या केल्यात भावा
Bhari re.
ReplyDeleteThank god me evdha calculation nai kela nhitr Degree la avghad gela asta 😀😅
Bhari re.
ReplyDeleteThank god me evdha calculation nai kela nhitr Degree la avghad gela asta 😀😅
शाहूच्या आठवणींचा संग्रह ?
ReplyDeleteAwesome Bro
ReplyDeleteWaiting for next part buddy.. something interesting to read..!!
ReplyDeleteKdkk ... bole to bhot hard
ReplyDeleteGr8...👏👏
ReplyDelete🍻🍻🍻
ReplyDeleteKdk na bhava... ��������
ReplyDelete