Inferiority Complex !!



                                         (75% ATTENDANCE - PART 04 )







    उन्हाळ्यात रेल्वेचा प्रवास, त्यात खिडकीची सीट. कानात हेडफोन होता आणि त्यावर coldplay ची प्लेलिस्ट चालू होती. रेल्वे वेगाने धावत होती आणि त्या गर्मीत खिडकीतून येणारा वारा चेहऱ्याला स्पर्श करून जाताना स्वर्ग प्राप्तीची अनुभूती करून देत होता. मी माझे डोळे बंद करून माझ्या वेगळ्या जगात रमलो होतो. आयुष्यात यापेक्षा सुंदर काही असूच शकत नाही अस मला वाटत होत. माझं हे सुंदर स्वप्न माझ्या चेहऱ्यावर पडलेल्या पाण्याच्या काही थेंबामुळे खंडित झालं. पण १ मिनिट .....उन्हाळ्यात पाऊस कसला? मी डोळे उघडले आणि समोर पाहतो तर काय, माझ्या समोर बसलेले काका वा मामा काय म्हणतात ते ; गुटखा खाऊन खिडकीतून बाहेर पिचकारी मारत होते आणि वाऱ्यामुळे ते तुषार माझ्या अंगाकडे येत होते. ईईईई !!! मला माझीच किळस आली. मी माझे हेडफोन काढले आणि मराठी अक्सेंट असलेल्या हिंदीत म्हणालो,"  ओ काका, क्या कर राहे हो ? बाहेर मत थुको. पुरा इधर आ राहा है !". काय माहित आतून किती जरी मराठी असलो तरी ट्रेन मध्ये बोलताना हिंदीच का येते. पण तो प्रवासी भलताच निघाला, तो काही ऐकणाऱ्यातला नव्हता आणि पुढून आणखीन म्हणाला कि,"भैया अडजस्ट करलो ना ". अरे !! यात काय आलय अडजस्ट करण्यासारखं? इकडे सगळं अंगावर येत होतं आणि हा वरून म्हणत होता कि अडजस्ट करा. माझा पारा आणखीनच चढला. "आपको समझ नाही आता है क्या ? बाहर आते वक्त देखा नहीं बडे बडे अक्षर में लिखा हुआ था. यहा थूकना मना है ", मी रागात म्हणालो. "हा तो उधर लिखा हुआ है ना ! यहा कहा लिखा हुआ है ", तो मामा तितक्याच निर्लज्जपणे म्हणाला.दरम्यान आमचा इकडे drama सुरु असताना आजूबाजूची लोक आमचा हा show एन्जॉय करत होती. आता केवळ त्यांच्या हातात पॉपकॉर्न तेवढा राहिला होता.बराच वेळ वाद घातल्यानंतर तो मामा शेवटचा शांत झाला. ते पण माझे बोलणे पटले म्हणून नाही तर गुटख्याच दुसरं पॅकेट त्यांनी तोंडात टाकलं म्हणून. आता माझे उदात्त विचार ऐकण्यात आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यात त्या मामांना काहीच रस नव्हता.


मी माझी travelling bag खांद्यावर घेतली आणि तेथून उठून तोंड धुण्यासाठी दरवाज्याजवळ असलेल्या बेसिन कडे आलो. मला ट्रेन चा प्रवास फार आवडायचा ; आज देखील आवडतो. पण या अश्या अनुभवांमुळे मी ट्रेन बहुदा टाळत असे. तसं पाहिलं तर जनरल च्या डब्ब्यात हे असे अनुभव काही नवीन नव्हते ; हे आता नेहमीचेच झाले होते. एक तर महिनाभर घरी राहिल्यानंतर परत कॉलेजला जाणे जीवावर आले होते. कसतरी जीव-प्राण एक करून, मोठ्या कष्टाने मनाची तयारी करून रेल्वेत बसलॊ होतो. त्यात या मामाने तर पुर्ण मूडच ऑफ करून टाकला.
  एका junction वर ट्रेन थांबली. crossing असल्यामुळे आणखीन २० मिनिटे तरी ट्रेन येथून हलणार नव्हती. जरा उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून मी बाहेर प्लॅटफॉर्म वर येऊन थांबलो. प्लॅटफॉर्म वर पण वर्दळ होतीच. मी समोर जे पाहिलं ते माझा ह्रदयाचं धडधडणं अचानक मंद झालं ; नेहमी होत तसंच. हजारोंच्या गर्दीत देखील सहज ओळखू शकतो तो चेहरा माझ्या समोर होता ; कारण वर्गात मागच्या बाकावर बसून कित्येक तास त्या चेहऱ्याकडे पाहण्यात खर्च केले होते. तसं मी तिच्याकडे जाऊन Hi! Hello!  म्हणून बोलायला हवं होत. पण माझा लाजरा स्वभाव असावा वा माझा Inferiority Complex , माझी कधी स्वतःहून पुढे जाऊन बोलण्याची हिम्मत झाली नाही आणि १.५ वर्षे तिला फक्त पाहण्यातच निघून गेली. आता देखील असंच दुरुन पाहत बसलो होतो. नेहमी सारख्या तिच्या त्या २ मैत्रिणी सोबत होत्याच पण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष जातंय ? माझा एकाच ठिकाणी focus होता.


       मी तिच्याकडेच पाहत होतो आणि इतक्यात तिने माझ्याकडे पहिले. आमची नजरानजर झाली. माझ्याकडे पाहून तिने एक लहानशी smile दिली. The rare moment of my life. परतीत मी पण १ मोठी weird smile दिली. अन माझ्या आतील कवी लागलीच जागा झाला....


हसतेस किती गोड
तू दिसतेस किती गोड
दुर्मिळ आहेत तुझसारख्या गोष्टी
नाही तुझ्या सौंदर्याला तोड !!


                        वा !! काय छान लाईन्स आहेत. मी काही कवी नव्हतो पण का माहित नाही तिला पाहिले कि आपोआपच कविता सुचायच्या. wait ...हे communication smile पर्यंतच थांबायला हवं होत  पण हळूहळू ती तर माझ्याकडेच येत होती. आधी वाटलं कि आमच्या दोघांच्या दरम्यान असलेल्या वॉटर फिल्टर कडे ती जात असावी ; पण जस तिने तो फिल्टर क्रॉस केला आणि कन्फर्म झालं कि ती माझ्याकडेच येत आहे, माझं हृदयाच मंद धडधडणं अगदीच वाढलं. मला कळत नव्हत कि काय करू कारण stage वर उभा राहून १००० लोकांसमोर बोलणं माझ्यासाठी सोपं होत पण ती समोर आली कि तोंडातून शब्द फुटायला उशीर होत असे. कदाचित या मागे तोच तो माझा Inferiority Complex असावा. माझ्या मनात विचाराचं काहूर माजल असताना इकडे ती समोर येऊन थांबली देखील. नेमकं काय बोलावं मला कळेना ; पण पुढून तिनेच विचारलं," तू कुठे जात आहेस ?". स्वतःच्या आवाक्यात नसलेला मी आमची रेल्वे ज्या दिशेला जात होती त्या दिशेला बोट करून म्हणालो " तिकडे !!". एक  क्षण ती थांबली. तिला आणि मला दोघांला पण कळले नाही कि नेमकं काय होत आहे. एक लहानसा pause होऊन गेल्यावर ती माझ्याकडे पाहत हसत म्हणाली,"तुझा सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे हा !! ". हा तिने मला दिलेला पाहिला कॉम्प्लिमेंट. मी आणखीन भानावर यायचो होतो. मी पण awkward smile देत तिच्या हसण्यात सामील झालो. मग स्वतःला सावरत म्हणालो, "कॉलेजलाच निघालोय. संपल्या ना आता सुट्या. आता परत लागू कामाला ". हळूहळू माझां कॉन्फिडन्स वाढत चालला आहे हे मला माझ्या स्पष्ट येणाऱ्या आवाजातून जाणवत होत. " तर मग बॅग घेऊन बाहेर का फिरत आहेस? जागा नाही मिळाली का तुला? ", माझ्या खांदयावर लटकवलेली बॅग पाहून तिने मला विचारले.आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊन ती माझी tragic-war-drama स्टोरी सांगण्यापेक्षा फक्त मान हलवून नाही म्हणणे मला योग्य वाटले. यावर ती लगेच म्हणाली," तू आमच्या सोबत चल. आमच reservation आहे.आम्ही करू तुला अडजस्ट ". मला माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. खरंच माझ्यासोबत असं पण होऊ शकतं. मी वेळ न दवडता लगेच हो म्हटलं.  


          ट्रेन निघण्यापूर्वीचा  हॉर्न वाजला. लगबगीने ती तिच्या coach कडे वळली आणि मी तिच्या मागे. मला खिडकी बाजूची सीट मिळाली आणि माझ्या पुढच्याच बर्थ वर माझ्या पुढे ती. वेगाने वारा खिडकीतून आत येत होता आणि त्या वाऱ्याने तिचे मोकळे असलेले केस तिच्या चेहऱ्यावर येत होते. तिच्या केसांच्या आड असलेले तिचे ते सुंदर आणि  निरागस डोळे जे कि माझ्याकडेच पाहत होते, माझा हार्ट फेल करण्यासाठी ते पुरेसे होते. तिने हाताने ते केस कानामागे घेतले ; पण तिच्या सौंदर्यात एक कण देखील फरक पडला नव्हता.


             पूर्ण प्रवासभर आम्ही बोलत होतो. किंबहुना ती बोलत होती ; मी ऐकत होतो. आता ती काय- काय बोलली हे मला लक्षात नाही कारण माझं मन त्या conversation मध्ये होतच कुठे? ते तर कधीचच आकाशात जाऊन स्वैरपणे घिरट्या घालत होत, उडत होत आणि चौफेर वावरत होत. आयुष्यात ऐवढी अपेक्षा त्याने पण कधी केली नसावी. काही मिनिटांपूर्वी तिला फक्त दुरून पाहण्यात मला धन्यता वाटत होती आणि आता तिच्या समोर बसून मी तिला पाहतच नाही तर बोलत पण होतो. अन माझा Inferiority Complex !! ? तो तर कधीच लुप्त झाला होता.


   आता संध्याकाळची वेळ झाली होती. बाहेर सूर्य मावळतीला आला होता ; पण माझ्या आयुष्यात जो आशेचा सूर्य उगवला होता, त्याचे किरण कमीत कमी पुढचे आणखीन २ सेमिस्टर जगण्याइतके बळ तरी नक्कीच देत होते.  


                                                                             ..........................................(TO BE CONTINUED)








                         DO READ AND SHARE..!!

                      STAY TUNED FOR FOR NEXT PART

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

NEET वाटेने जा !!

" या प्रश्नाला उत्तर मी बनणार "

स्टोरीमध्ये TWIST